एसटीचा प्रवास महागणार? 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोज

मुंबई :  देशात डिझेल दर वाढीचा मोठा फटका लालपरीला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. डिझेल वाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. डिझेल वाढीमुळे आतापर्यंत एसटी महामंडळाच्या खर्चात तब्बल ३१० कोटींची वाढ झाली आहे. याआधी ३३०० कोटी रुपयांचा खर्च महामंडळाचा डिझेलवर होत होता. आता याच खर्चात ३१० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. १५ मेला डिझेलची पहिली वाढ ३.१० पैशांनी झाली, त्यावेळी १२४ कोटी रुपयांचा खर्च वाढला. दुसरी वाढ ९३ पैशांनी झाल्यानंतर ३७.२० कोटी रुपयांचा खर्च वाढला. तिसरी वाढ ९१ पैशांनी झाल्यानंतर ३६.४० रुपयांनी खर्च वाढला. चौथी दरवाढ २.८१ पैशांनी झाल्यानंतर ११२.४० कोटी खर्च वाढला. आतापर्यंत झालेल्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा डिझेलवरील खर्च तब्बल ३१० कोटी रुपयांनी वाढला आहे.
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला नाही तर एसटीची भाडेवाढ अटळ आहे. तर आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्याचबरोबर डिझेल बचतीसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.(Pratap Sarnaik)

यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी म्हटलं की, प्रत्येक आगारातून पाच लिटर डिझेल बचतीच्या सूचना प्रत्येक आगारांना सूचना दिल्या आहेत. जे आगार जास्त डिझेल बचत करेल त्यांना बक्षीस देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. देशात सातत्याने होत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याभरात दोनवेळा डिझेलचे दर वाढले असून, सध्या डिझेल ९१ रुपयांच्या पार गेले आहे. डिझेल प्रतिलिटर ३ रुपये १० पैशांनी महागल्यामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ ते १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळ आधीच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एकट्या एप्रिल २०२६ या एका महिन्यात महामंडळाला जवळपास ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.  महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली, तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरेल, असे संकेत प्रताप सरनाईकांनी दिले आहेत.(Pratap Sarnaik)

Pratap Sarnaik : सध्या तातडीने भाडेवाढ नाही पण….

प्रवाशांना दिलासा देताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी तातडीने कोणतीही तिकीट किंवा भाडेवाढ लागू केली जाणार नाही. मे महिन्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा आढावा घेऊन पुढील निर्णय ठरवला जाईल. एसटी बस प्रवासात महिलांना दिलेली ५०% सूट, दिव्यांगांना आणि समाजातील विविध घटकांना दिली जाणारी मोफत प्रवासाची सुविधा याचे पैसे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला नियमित मिळतात, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर एसटी महामंडळात येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर दिला जात असून, राज्यातील प्रमुख २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर भाडेवाढ काही प्रमाणात करावी लागेल असे संकेत देखील मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आहेत.(Pratap Sarnaik)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या संभाव्य भाडेवाढी संदर्भात आणि आर्थिक तोटा टाळण्यासाठी मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीला एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत तब्बल ४ वेळा डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवले आहे.डिझेलच्या या सततच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा वार्षिक खर्च तब्बल ३१० कोटी रुपयांनी वाढला आहे. पूर्वी डिझेलवर ३,३०० कोटी रुपये खर्च व्हायचे, जो आता वाढून सुमारे ३,६१० कोटी रुपयांवर गेला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. (Pratap Sarnaik)

Pratap Sarnaik : एसटी महामंडळ ५५ लाख प्रवाशांना सेवा…

एसटी महामंडळाला चार कंपन्यांकडून डिझेल पुरवठा होतो. १० लाख ८७ हजार लीटर डिझेल लागते. हा पुरवठा थांबू नये, काही ठिकाणी पुरवठा कमी आहे, म्हणून या कंपन्यांना सूचना व विनंती केली आहे. एसटी महामंडळ ५५ लाख प्रवाशांना सेवा देते. प्रति लीटर नुकसान होत असले तरी महामंडळाचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली आहे. त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली आहे
प्रत्येक आगारातून ५ लीटर बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून रोज १ हजार लीटर डिझेल बचत होईल. तातडीच्या सूचना चालकांना देण्यासाठी आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. वाहन चालकांचे योग्य समुपदेशन करायला सांगितले आहे. तसेच बसेसची योग्य देखरेख करायला सांगितले आहे. बचत करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ता व गौरव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जी आगार अधिक बचत करतील, त्यांनाही प्रोत्साहित केले जाईल असंही ते म्हणालेत.

डिझेल दरवाढ होत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. आजही दर स्थिर नाहीत. सध्या तरी शासनाच्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करत आहोत. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर दरवाढ करावी लागेल. आम्ही डिझेल वरील कर कपातीची मागणी राज्य व केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. आमच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे हे मात्र निश्चित आहेकाही प्रमाणात वाढ करून एसटी चालू ठेवावी लागेल, असंही सरनाईकांनी म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.