राज्य आंबा उत्पादक संघाचे कृषी, फलोत्पादन परिषद व प्रदर्शन
राज्य आंबा उत्पादक संघाच्या (एमएसएमजीए) वतीने कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, विपणन, कोल्डचेन व वेअर हाऊसिंग परिषद आणि सिद्धेश्वर अॅग्रोटेक प्रदर्शन मोठय़ा उत्साहात पार पडले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या परिषदेचे मुख्य उद्देश होते. एमएसएमजीएचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एनएसईचे मुख्य अर्थतज्ञ तीर्थंकार पटनाईक, एचपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक टी. राजेश, महाव्यवस्थापक प्रदीप्तो बॅनर्जी, प्रगतीशील शेतकरी व सोहन इंडस्ट्रीजचे एमडी भारत तावरे, एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक सौरभ रथ, मेघमणी इंडस्ट्रीजचे संजय सुतार, युनिव्हर्सल बायोकेनचे विश्वास सोंडकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा
परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष मोकल यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विषयांवर चर्चा केली. मध्यपूर्वेतील युद्धामुळे आंबा उत्पादक अडचणीत आला असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, एनएसईचे मुख्य अर्थतज्ञ तीर्थंकार पटनाईक यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मार्गदर्शन करत एनएसईतर्फे शेतकऱयांना बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
Comments are closed.