244 जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक हवाई हल्ला चेतावणी प्रणाली
क्षेपणास्त्र, ड्रोन, लढाऊ विमानाच्या हल्ल्यापूर्वी देणार इशारा : नागरी स्वयंसेवकांना दिले जाणार प्रशिक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संवेदनशील किंवा शत्रूच्या हवाई हल्ल्याच्या स्थितीत सर्वप्रथम संकटात येऊ शकणाऱ्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकार अत्याधुनिक एअर रेड वॉर्निंग सिस्टीम लावण्याचे काम करत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान राजस्थानपासून जम्मू-काश्मीरपर्यंत पाकिस्तानने शेकडो ड्रोन डागून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता अशाप्रकारच्या स्थितीकरता केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.
केंद्र सरकार अत्याधुनिक एअर रेड वॉर्निंग सिस्टीम (एआरडब्ल्यूएस) प्रकल्पावर काम करत असून याकरता वायुदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रियाही सुरू झाली आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व हवाई सुरक्षा अभियानाच्या क्षेत्रात पूर्णपणे कुशल असणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे.
244 जिल्ह्यांमध्ये एअर रेड वॉर्निंग सिस्टीम
-एअर रेड वॉर्निंग सिस्टीम सर्वप्रकारचे ड्रोन्स, क्षेपणास्त्रs आणि लढाऊ विमानांच्या हवाई हल्ल्यांच्या धोक्याच्या स्थितीत नागरिकांना सतर्क करणार.
-प्रकल्पावरील काम पूर्ण झाल्यावर देशातील सर्व 244 संवेदनशील जिल्हे कुठल्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यावरून या इशारा नेटवर्कशी जोडले जाणार.-या प्रकल्पाकरता निवडण्यात आलेल्या या 244 जिल्ह्dयांपैकी बहुतांश जिल्हे सीमावर्ती भागांमध्ये आहेत. तेथे ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार.
ऑपरेशन सिंदूरनंतर जाणवली गरज
-नागरी सुरक्षा मॅन्युअलनुसार जमिनी स्तरावरच एक स्टँडर्ड एअर वॉर्निंग सिस्टीमही अस्तित्वात राहिल हे या प्रकल्पामुळे सुनिश्चित होईल.
-नव्या एअर डिफेन्स वॉर्निंग सिस्टीमचा प्रस्ताव मागील वर्षी ऑपरेशन सिंदूरंच्या त्वरित नंतर सरकारसमोर विचाराकरता मांडण्यात आला होता.
-युद्धात ड्रोन्सचा वापर सुरू झाल्यापासून नागरिकांसाठी हवाई सुरक्षा इशारा प्रणालीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-एअर रेड वॉर्निंग प्रकल्प पूर्णपणे स्थापित झाल्यावर नागरी स्वयंसेवकांना याच्याशी निगडित प्रशिक्षण देण्याचे काम केले जाणार आहे.
गृह मंत्रालयाच्या अधीन प्रकल्प
ऑपरेशन सिंदूरनंतर काही एअर वॉर्निंग सिस्टीम योगप्रकारे काम करत नव्हत्या आणि त्यातील अनेक कालबाह्या ठरल्या होत्या असे उघड झाले होते. या प्रणालींच्या जागी तात्कालिक सायरनचा वापर करावा लागला होता. एअर रेड वॉर्निंग सिस्टीम प्रकल्पाची धुरा डायरेक्टोरेट जनरल-फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स आणि होम गार्ड्स करत असून ते गृह मंत्रालयाच्या अधीन आहे. या प्रकल्पासाठी वायुदलातून निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. या अधिकाऱ्यांनी यापूर्वी हवाई सुरक्षा अभियान, रडार सिस्टीम आणि एअर-रेड वॉर्निंग प्रक्रियेवर काम केलेले आहे.
Comments are closed.