स्वदेशी 'वायू अस्त्र'ची यशस्वी चाचणी

राजस्थान अन् उत्तराखंडमध्ये अनेक चाचण्या

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संपूर्ण स्वदेशनिर्मित ‘वायू अस्त्रा’चे पुणे स्थित ‘नाईब लिमिटेड’ या कंपनीकडून यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. आकाशात ‘रेंगाळत’ राहून लक्ष्य टप्प्यात येताच त्याच्यावर घातक प्रहार करण्याची या ड्रोनसदृश शस्त्राची क्षमता आहे. राजस्थानातील पोखरण आणि उत्तराखंड राज्यातील जोशीमठ येथे या शस्त्राचे परीक्षण करण्यात आले असून ते पूर्ण यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

या शस्त्राचे प्रभावक्षेत्र 100 किलोमीटर इतके कमीत कमी आहे. पोखरण येथे हे परीक्षण 18 एप्रिल आणि 19 एप्रिल असे दोन दिवस, तर जोशीमठ येथे हे परीक्षण 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला करण्यात आले आहे. या परीक्षणांची माहिती आता घोषित करण्यात आली आहे. नाईब लिमिटेड ही खासगी कंपनी असून या कंपनीने ‘विनामूल्य, विनावचन’ (एनसीएनसी) तत्वावर हे परीक्षण केले.

आकाशात ‘रेंगाळत’ मारा

हे शस्त्र ड्रोनप्रमाणे आकाशात विशिष्ट उंचीवर तरंगत किंवा रेंगाळत राहते. त्याचे पूर्वनिर्धारित लक्ष्य आवाक्यात येताच ते त्याच्यावर आदळते. एकाच आघातात लक्ष्य नष्ट केले जाते. या शस्त्राचा मारा अत्यंत अचूक आहे. कधीतरी तो केवळ एक मीटरने चुकू शकतो. आपल्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असणारे लक्ष्यही हे शस्त्र अचूक टिपू शकते, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.

14 हजार फूट उंचीवरून मारा

लक्ष्य आपल्या दृष्टीपथात येईपर्यंत हे शस्त्र आकाशात 14 हजार फुटाहून अधिक उंचीवर तरंगत आपल्या लक्ष्याची प्रतीक्षा करत राहते. आकाशात तरंगण्याची किंवा रेंगाळण्याची त्याची क्षमता 90 मिनिटे कालावधीची आहे. या कालावधीत लक्ष्यभेद न झाल्यास ते परत येते. तसेच लक्ष्यभेद पूर्ण केल्यानंतरही ते पुढच्या उ•ाणासाठी परत मिळविता येते. त्यामुळे त्याचा चालन खर्च अत्यंत कमी आहे. या शस्त्राच्या सर्व पैलूंची परीक्षणे यशस्वी झाली, ओ स्पष्ट करण्यात आले.

‘सूर्यास्त्रा’चेही परीक्षण

या कंपनीने सूर्यास्त्र नामक एका सर्वंकष अग्निबाण प्रक्षेपण यंत्रणेचीही स्वदेशी निर्मिती केली आहे. या यंत्रणेचे परीक्षण 18 मे आणि 19 मे असे दोन दिवस करण्यात आले असून ते यशस्वी झाले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे सलग परीक्षण ओडीशा राज्यातील चांदीपूर येथील अंतरिम परीक्षण केंद्रात करण्यात आले. ही माहिती कंपनीने 20 मे या दिवशी एका पत्रकाद्वारे पत्रकारांना दिली आहे.

भारतीय सेनादलाकडून मागणी

या कंपनीकडे भारतीय भूसेनेने ‘सूर्यास्त्र’चा तातडीचा पुरवठा करण्यासाठी मागणी नोंदविली आहे. जानेवारी 2026 मध्ये ही मागणी नोंदविण्यात आली होती. तेव्हा या कंपनीने हे अस्त्र विकसीत केले होते. त्याच्या परीक्षणाचे सर्व टप्पे आता यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ते भूसेनेला पुरविण्यात येणार आहे. ‘सूर्यास्त्रा’समवेत 150 ते 300 किलोमीटर टप्प्याचे अग्निबाण (रॉकेट्स्) ही पुरविण्यात येतील.

ड लांब अंतरावर मारा : 100 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद

ड आकाशातील उंची : 14 हजार फुटापेक्षा अधिक उंचीवरुन लक्ष्याचा वेध

ड प्रभाव क्षेत्र क्षमता : डोंगराळ भागात आणि सखल भागात प्रभावी मारा

ड तरंगण्याची क्षमता : आकाशात 90 मिनिटे तरंगून लक्ष्य शोधण्यास सक्षम

ड पुनर्भेदाची क्षमता : या शस्त्राचा उपयोग पुन्हा लक्ष्यभेदासाठीही शक्य

ड कवचभेद क्षमता : इन्फ्रारेड कॅमेऱ्यामुळे जाड भिंती, कवचांचाही भेद शक्य

ड स्फोटकांचे वजन : एक वायू अस्त्र 10 किलो स्फोटके वाहून नेऊ शकते

ड नियंत्रण हस्तांतरण : शस्त्राचा उपयोग होत असताना हस्तांतरण शक्य

ड पुनउ&पयोग क्षमता : या शस्त्राचा अनेकवेळा उपयोग करता येणे शक्य

Comments are closed.