चंद्रपूरात काँग्रेसचे 10 नगरसेवक आमच्यासोबत यायला तयार, सुधीर मुनगंटीवारांचा दावा

चंद्रपूर महानगरपालिका: चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आज (२७ जानेवारी) सकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. सत्ता स्थापने बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भाजप आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांच्या सोबत चर्चा झाली. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द महत्त्वाचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किशोर जोरगेवार आणि बंटी भांगडीया यांना सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. शिवसेना उबाठाला महापौर पद द्यायचे की नाही? याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय कुठलाच निर्णय होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सोबतचशिवसेना उबाठाला महापौर पद देण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांचं मत प्रतिकूल आहे, त्यामुळे मुनगंटीवार यांच्या सोबत आज चर्चा झाल्यावरच याबाबत अखेरचा निर्णय होईल, मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांना भेटण्याची शक्यता आहे.

Sudhir Mungantiwar : काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, नगरसेवकांची भाजप सोबत येण्याची इच्छा

दरम्यान, काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांची भाजप सोबत येण्याची इच्छा आहे. शिवाय चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद आणि दोन वर्ष स्थायी समितीसाठी आम्ही तयार होतो. मात्र त्यांना महापौर पद हवं आहे. त्यामुळे या अनुषंगानेही संवाद सुरू असल्याचेही ते म्हणाले. सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत यश आलं तर निश्चित महापौर आमचाच होईल असा दावाही त्यांनी केला आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्यानं खूप भोगलंय, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी गेल्या दहा वर्षात पूर्ण शक्तीने काम केलं

चंद्रपूर जिल्ह्यानं खूप भोगलं आहे. हा जिल्हा खूप मागे होता. गेल्या दहा वर्षात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आम्ही फार प्रयत्न केले, पूर्ण शक्तीने काम केलंय. माझ्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात आमचा महापौर झाला तर जिल्ह्यात अजून 23-24 प्रोजेक्ट आहे ते सुरळीत झाले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि वंचितसोबत देखील संवाद सुरू आहे. या त्यांच्यातील संवादात एका फेरी तर अंतिम टप्प्यातही गेली होती. पण अचानक पणे काय झालं माहिती नाही त्यांनी महापौर पदाची मागणी केली. मात्र आम्ही उपमहापौर पद आणि दोन वर्ष स्थायी समितीसाठी आम्ही तयार होतो, असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.