शेतकरी आंदोलन चिघळले पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प; देवाभाऊंचे सरकार झोपी गेले! ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल… रस्त्यावरच रात्र काढण्याची वेळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उसाला 4 हजार 500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर आंदोलन सुरू आहे. महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामध्ये फळ-फुले, भाज्यांच्या शेकडो ट्रकांसह दिवाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱया हजारो प्रवाशांची वाहनेही अडकली आहेत. अन्नपाण्यावाचून लोकांचे हाल सुरू आहेत. रस्त्यावरच झोपून रात्र काढण्याची वेळ लोकांवर आली आहे तरीही देवाभाऊंचे सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे. चिघळत चाललेले हे आंदोलन थांबवण्यासाठी कोणतीच पावले सरकारकडून उचलली जात नसल्याने तीव्र संताप पसरला आहे.

शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी किणी टोलनाक्यावर राजू शेट्टी यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

सांगली, सातारा आणि कोल्हापुरात आज बंदची हाक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मध्यस्थी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उद्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.

Comments are closed.