बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, ‘मी
Sujay Vikhe on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना विधानसभेच्या निवडणूक निकालावर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) संशय व्यक्त केला. एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या पराभवावर देखील संशय व्यक्त केला होता. त्यांच्या संशयाच्या वक्तव्यानंतर माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांनी संगमनेरच्या (Sangamner) मतदारांचा अपमान केला आहे. त्यांनी पुढच्या वेळेस त्यांच्या दौऱ्याची सुरवात संगमनेरपासून करावी आणि तिथल्या लोकांच्या वेदना काय होत्या हे जाणून घ्याव्यात. तेथे 7 टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चहेऱ्या मागे जनता किती रडत होती हे त्यांना कळेल. मी राज ठाकरेंचा फॅन आहे. मात्र, मी त्यांचं समर्थन करणार नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले सुजय विखे?
सुजय विखे यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यात आले पाहिजे. संगमनेर तालुका कुठे आहे? हे त्यांना माहितीये की नाही, याबाबत मला माहिती नाही. इथल्या लोकांच्या वेदना काय आहेत. लोकांच्या भावना काय आहेत. ज्या दिवशी राज ठाकरे संगमनेरमध्ये येऊन सामान्य माणसात मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की, परिवर्तन का झाले आहे. राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे संगमनेरच्या गोरगरीब जनतेचा अपमान आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. माणूस जेव्हा आपल्या हक्कांसाठी पेटून उठतो तेव्हा परिवर्तन होतं. हे परिवर्तन तालुक्याच्या जनतेने केले आहे. हे कुठल्या ईव्हीएमने केलेले नाही. त्यामुळे माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुमच्या पुढील दौऱ्याची सुरुवात संगमनेरपासून करावी. संगमनेरच्या 7 टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चहेऱ्या मागे जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि त्यांना परिवर्तनाचे उत्तर मिळेल. मी स्वतः राज ठाकरे यांचा फार मोठा फॅन आहे. पण बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मी समर्थन करू शकत नाही. येथे संघटनेने मोठे काम केले त्यामुळे परिवर्तन झाले आहे. मात्र, त्यांची भूमिका काय असावी आणि काय नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.
बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंचं भाष्य
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर देखील भाष्य केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा संपर्क आणि काम आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. साधारण 70 ते 80 हजारांच्या मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे झाले? लोकांनी मतदान केले, पण केलेले मतदान कुठे तरी गायब झाले, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.