जिथे दादा उभे होते, तिथे उभे राहताना…., सुनेत्रा पवार फडणवीस-शिंदेंसमोर भावूक; शिवनेरीच्या सा
Sunetra Pawar Shivneri Fort Speech: महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारताचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवभक्तांचा मोठा जल्लोष, पारंपरिक वाद्ये आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला. उपमुख्यमंत्री नात्याने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता. यावेळी भाषण करत असताना सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. (Sunetra Pawar Emotional Shivneri Fort Speech )
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? (Sunetra Pawar Shivneri Fort Speech)
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, यापुर्वी अनेक वेळा मी छत्रपती शिवाजी महाराजाचं दर्शन घेण्याची संधी आली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती. ज्या कठीण प्रसंगी मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी माझ्या नजरेसमोर जिजाऊ होत्या. अजित पवारांनी आयुष्यभर ज्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी वाटचाल केली तो विचार मी आयुष्यात कधीही सोडणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासन देते. याच ठिकाणी अजितदादांनी अनेकदा भाषण दिलेले आहे, असं बोलताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला. अजितदादांना या शिवनेरी किल्ल्याबद्दल जिव्हाळा तर होताच पण या शिवनेरी किल्लयाचे सुशोभीकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील होते.
सुनेत्रा पवारांचा शिवनेरीच्या साक्षीने रयतेला पहिला शब्द- (Sunetra Pawar Shivneri Fort Speech)
अजित पवारांनी मागील अर्थसंकल्पात देखील आग्रा, संगमेश्वर, रायगडवढू बुद्रुक या ठिकाणी कामे सुरू केली होती. या प्रत्येक ठिकाणी भावी पिढीला प्रेरणा मिळणार आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असेल. अजितदादांनी आयुष्याभर वाटचाल केलेल्या शिव-शाहू-फुले- आंबेडकरांचा वारसा मी कधीच सोडणार नाही, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी शिवनेरीतील भाषणातून दिल्या.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Shivneri Fort Speech)
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा आजचा भुगोल आणि इतिहास आजच्या सारखा दिसला नसता. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. आज मला सांगताना आनंद वाटतोय की युनेस्कोने 12 किल्यांना वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजितदादांच्या इच्छेनुसार महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त झाले आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच 2030 साली 400 वी शिवजयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करु, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.