Video समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही; सुनेत्रा पवार भावुक,अध्यक्षपदी पहिल भाषण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय (NCP) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारख नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी, त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.
अजित दादांना आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहिल्याचे मी पाहिलं. त्यांच स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, आपण सर्वजण ते पूर्ण करणार आहोत. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष आहे, म्हणूनच काम करतच आहे. पुन्हा एकदा आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे. आता शहरात देखील पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांना पक्षबळकटीला प्रोत्साहन देणारं भाषण सुनेत्रा पवार यांनी केलं.
लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे, पण इथेच आपली जबाबदारी संपत नाही. शेतकरी महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, दादांनी शेतीसाठी एआय टेक्नॉलॉजी आणली होती, त्यावरही आपल्याला काम करायचं आहे. आता, सह्याद्री आपल्यासोबत राहिला नाही. मात्र, त्याने दिलेला विचार आणि शिकवण पुढे घेऊन जायची आहे. आपणास शारदाबाई पवार यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचं आहे, दादा अचानक गेले आणि मोठमोठ्या सगळ्या जबाबदारीचं ओझ ठेऊन गेले. सगळ्यांच्याच अपेक्षांचं ओझ आणि जाणीव मला आहे. यापुढे महाराष्ट्राचं कल्याण आणि जनतेचे भलं हेच लक्ष असणार आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. असे म्हणत अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. यावेळी, उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला दाद दिली.
पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार – पटेल
राज्यसभेसाठी पार्थ अजितदादा पवार हे आमचे उमेदवार असतील. विजयासाठी 37 मतांची गरज आहे, पण आमच्याकडे 40 मतं आहेत. आम्ही चाळीसच्या चाळीस आमदार एकमताने, एक दिलाने पार्थ पवार यांना निवडून देऊ, अशी घोषणाच प्रफुल पटेल यांनी केली.
हेही वाचा
मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची घोषणा
आणखी वाचा
Comments are closed.