Video भविष्यात पवार वि. पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात..
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनानंतर सुरु झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याचं दिसून येत आहे. त्यातच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम लागल्याचं म्हटलं आहे. मात्र, यापुढे पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्षा माझ्याकडून तरी पाहायला मिळणार नाही. लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. त्यावर, आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी विसंगती दर्शवली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं स्वागत करत दुजोरा दिला आहे.
सुप्रिया सुळेंनी भविष्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष होऊ देणार नाही,rohi मी तरी तसं लढणार नाही असे म्हटले. गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत, पवार आडनावाची आहेत यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही. हेही इलेक्शन मी लढले नव्हते, याही इलेक्शनचा खूपसा इतिहास आहे. जो आज सांगणं गरजेचं वाटत नाही. मागच्या वेळेस देखील तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती इथून पुढेही नसणार आहे. पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदार संघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, जर दुसऱ्या कोणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करेन अडचण काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलताना केला. त्यामुळे, भविष्यात बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही घराण्यातली लढाई नसेल, हेच त्यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याचा सुनेत्रा पवारांकडून स्वागत करण्यात आलंय.
सुनेत्रा पवारांकडून स्वागत (Sunetra pawar on supriya Sule)
मी राजकारणात आल्यापासून सांगत आले आहे की, आमचं कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होणार नाही हे सुप्रियाताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आमची संपूर्ण पवार कुटुंबीयांची देखील तीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांनी देखील सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही (Rohit pawar on supriya sule)
आमदार रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. सुप्रियाताईंनी जी भूमिका घेतली, ती भावनिक होऊन घेतली, कदाचित राजकीय देखील असू शकेल. मात्र, पवार विरुद्ध पवार का झालं, भाजपविरुद्ध किंवा महायुतीविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. राजकारणात आज एक आणि उद्या दुसरं असं होतं. त्यामुळे, सध्या जे महायुतीत आहेत, ते महायुतीत राहणार नाहीत तेव्हाच पवार विरुद्ध पवार होणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये आपला विरोध कायम असल्याचे सांगितले. तसेच, अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंच्या भूमिकेशी त्यांनी असहमतीच दर्शवल्याचे दिसून येते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.