गुन्हा मागे घेतल्यानंतर रखडलेला भाजप प्रवेश कधी होणार? सुनील बागुलांनी मुहूर्त सांगितला
सुनील बॅग: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा भाजप (BJP) प्रवेश पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. शक्ती प्रदर्शन करत नाशिकमध्येच प्रवेश सोहळा करावा, अशी सुनील बागुल आणि त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. त्यामुळे नाशिकमध्ये प्रवेश घ्यावा की मुबंईत याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मामा राजवाडे आणि सुनील बागूल यांचावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र नाट्यमयरित्या तक्रारदाराने गुन्हे मागे घेतल्यानं बागुल आणि राजवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग खुला झाला आहे. सुनील बागूल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने ते सध्या ठाकरेंच्या शिबसेनेतही नाहीत आणि भाजपामध्येही देखील नाहीत यामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. आता सुनील बागुल यांनी भाजपमधील रखडलेल्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले आहे.
सुनील बागुल म्हणाले की, जो गुन्हा दाखल झाले आहे तो पूर्णपणे संपवावा लागेल. गुन्ह्याचं स्वरूप संपेपर्यंत आम्हाला थांबावं लागेल, असे सांगण्यात आले होते. आज अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर आमचा प्रवेश नाशिकला घ्यायचा किंवा मुंबईला घ्यायचा? त्यातल्या त्यात नाशिकला प्रवेश घेतला तर कोण नेते पाहिजे? या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे.
अधिवेशनानंतर एक आठवड्याच्या आत भाजप प्रवेश होणार
अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, तुम्हाला नाशिक हवे असेल तर नाशिकमध्ये देण्यात येईल मुंबई हवे असेल तर मुंबईमध्ये प्रवेश घेण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीकडून सांगण्यात आल्याची माहिती सुनील बागुल यांनी दिलीये. तर अधिवेशनानंतर एक आठवड्याच्या आत मी, बाळा पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये आणि इतर काही नगरसेवकांचा एकत्र भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये नाशिकमध्ये की मुंबईमध्ये होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तक्रारदाराने तक्रार घेतली मागे
दरम्यान, मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दुसरीकडे, या दोघांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. तो मिळेपर्यंत बागूल, राजवाडे अज्ञातवासात होते. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी या दोघांची नोंद ‘फरार’ अशी झाली होती. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. त्यानंतर तक्रारदार गजू घोडके यांनी तक्रार मागे घेतल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला.
https://www.youtube.com/watch?v=iangfad8mh8
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.