32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्…; त्
Sunil Raut on Shivsainik chetan thakurs death: मुंबईच्या विक्रोळीमध्ये चेतन ठाकूर (Chetan Thakur) या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री फक्त ताप आल्यानं आदल्या दिवशी त्यांनारुग्णालयात नेलं होतं, मात्र सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. चेतन ठाकूर (Chetan Thakur) यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, आमदार सुनील राऊत (Sunil Raut) रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. तर या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना सुनील राऊत (Sunil Raut) यांनी म्हटलं की, आता हे टोटल कमर्शियल झालं आहे. कमर्शियल झाल्यानंतर आजपर्यंत हॉस्पिटलची व्यवस्था अशी आहे की, ज्या ज्या वेळी इथे पेशंट येतो. साधं जरी काही झालं असलं तरी तीन चार लाख रुपये बिल होऊन जातं आणि आलेल्या पेशंट मधले 50% पेशंट घरीच जात नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.(Sunil Raut)
Sunil Raut on Shivsainik Death:32 वर्षाचा मुलगा तीन महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, चालत चालत तो…
आज ही कालची घटना अशी आहे की 32 वर्षाचा मुलगा तीन महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, चालत चालत तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, योग्य त्याचं निदान न झाल्यामुळे किंवा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याचा काल मृत्यू झाला, त्याला एक इंजेक्शन दिलं गेलं ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थंडी ताप भरला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा हॉस्पिटलचा पूर्ण हलगर्जीपणा आहे, तीनशे चारशे लोक इथे जमा आहेत. मी आहे, दत्ता दळवी आहेत, आम्ही सगळे, आमचे पदाधिकारी आहोत, आमचं म्हणणं एवढंच आहे की, हे हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी लोकांसाठी याचा काडीमात्र उपयोग नाही हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे, इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे इथे आलेला माणूस हॉस्पिटल बघून ऍडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो, त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की, हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं असंही पुढे आमदार सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.(Sunil Raut)
Sunil Raut on Shivsainik Death: संबंधित रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे राहणारे चेतन ठाकूर (वय ३२) यांचा विक्रोळीतील ‘आदी आरोग्य’ या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रुग्णालयात गोंधळ घालत संबंधित रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वारंवार या रुग्णालयात अशा घटना घडत आहे व गेल्या वर्षी दहीहंडी वरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता पालिका रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले होते, मात्र या रुग्णालयाने या मृता व्यक्तीवर या रुग्णालयात उपचार सुरू ठेवले होते आणि चार दिवसानंतर साडेतीन-चार लाख बिल करून त्याला मयत घोषित केले होते असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला आहे, यामुळे आमदार सुनील राऊत यांनी संबंधित रुग्णालय पालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली.तसेच आधी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.मात्र, रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Shivsainik Death: नेमकं काय घडलं?
चेतन ठाकूर यांना काल रात्री तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी विक्रोळीतील ‘आदि आरोग्य’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज सकाळी अचानक त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. साध्या तापाने रुग्णाचा मृत्यू कसा झाला? असा सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.चेतन ठाकूर यांच्या निधनानंतर रुग्णालयात स्थानिक शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, शिवसैनिकांनी रुग्णालयावर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीवर ठाम भूमिका घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Comments are closed.