NCP Merger: “अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर अभिमान.., सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करा”; सुनील शेळकेंचं मोठे विधान
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणासाठी बैठका झाल्या होत्या, गाठीभेटी झाल्या होत्या, त्या चर्चा सुरू होत्या, विलीनीकरण होणार की नाही अशा चर्चा आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार सुनील शेळके म्हणाले, दादांच्या (Ajit Pawar) दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही मंडळी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष एकत्रित पुढे जायचं आहे, परंतु अशा पद्धतीने आमच्याशी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी दादांनी विस्तृतपणे चर्चा केलेली नव्हती, परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उत्तर अधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी आल्या पाहिजेत, आदरणीय अजित दादा (Ajit Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ती जबाबदारी, तो मान, सुनेत्रा वहिनींना मिळाला पाहिजे होता. ही आमची भूमिका स्पष्ट होती, आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व त्यांना मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असेल तर तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकपणांनी पाहायला पाहिजे, असंही सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.(Sunetra Pawar)
“दादांची उणीव भासतेय”
आमदार शेळके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, दैनंदिन कामकाज करताना अजित दादांची उणीव पावलोपावली भासत आहे. दादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांची दादांशी चर्चा झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत होते. “दादांचे उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सन्मान मिळायला हवा, ही भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडली असून ती योग्यच आहे,” असेही ते म्हणाले.
शेळके पुढे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल. ज्यांना पक्षाचे हित हवे आहे, ते सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व नक्कीच मान्य करतील.”
अजित दादांच्या अपघाताचे सत्य लवकरच समोर येईल
अजित पवार यांचा अपघात की घातपात? या प्रश्नावर बोलताना शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघाताचे सत्य लवकरच सर्वांसमोर आणतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे शेळके यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.
नेमकं काय काय म्हणालेत शेळके?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणासाठी बैठका झाल्या होत्या, गाठीभेटी झाल्या होत्या, त्या चर्चा सुरू होत्या, विलीनीकरण होणार की नाही अशा चर्चा आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना सुनील शेळके म्हणाले, दादांच्या दुर्घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील काही मंडळी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष एकत्रित पुढे जायचं आहे, परंतु अशा पद्धतीने आमच्याशी किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी दादांनी विस्तृतपणे चर्चा केलेली नव्हती, परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती. दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उत्तर अधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी आल्या पाहिजेत, आदरणीय अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ती जबाबदारी, तो मान, सुनेत्रा वहिनींना मिळाला पाहिजे होता. ही आमची भूमिका स्पष्ट होती, आज सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होत असेल सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व त्यांना मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून पुढे जात असेल तर तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल, आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनी सकारात्मकपणांनी पाहायला पाहिजे, आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनींचा नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जातील असं देखील माझं मत आहे, असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
राज्यभरातील दादांच्या चाहते असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, माझ्या महिला भगिनी असतील, यांना आज दादांच्या आठवणी झाल्याशिवाय राहत नाही. ज्या नेत्यांने या महाराष्ट्राकरता 30 ते 35 वर्ष झिजवले, महाराष्ट्राला पुढे कसे नेता येईल हे स्वप्न उराशी बाळगून काम करत राहिले, त्या अजित दादांची रोज आठवण आल्याशिवाय राहत नाही, दादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाच्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारून काम करत आहेत, दादांची उणिव अधिवेशनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर जाणवली आहे, ज्या नेत्याने पुणे जिल्हा कसा पुढे जाईल किंवा पुणे जिल्ह्यात प्रत्येक अधिवेशनामध्ये चांगला प्रकल्प कसा आणता येईल हे देखील दादांनी सातत्याने पाहिलं, माझ्या मावळ तालुक्यात देखील मागील पाच अधिवेशनात कोणता ना कोणता चांगला प्रकल्प नक्कीच आम्हाला मिळत होता, परंतु आज प्रत्येक विधिमंडळातल्या सत्तेतील आमदाराला 25 कोटी रुपयांचा निधी दिला, तेव्हा आम्हालाही मिळाला, परंतु दुसरे इतर कोणते प्रकल्प त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा पांढरा डोंगराचा पायथा या ठिकाणी जवळपास बाराशे ते चौदाशे कोटी रुपयांचा कॉरिडॉर उभारण्याचं स्वप्न दादांचा होतं, ते स्वप्न मात्र या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण करता आलं नाही, आगामी काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सुनेत्रा वहिनी असतील ते दादांचे स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे, असंही सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.