‘मारकुट्या’ सूरज चव्हाणांची नियुक्ती का केली? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सगळंच सांगितलं; म्हण
सूरील तत्कारे वर सूरज चवन: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरज चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावरून छावा संघटनेसह विरोधकांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे म्हणाले की, घटना कशामुळे घडली? त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मी आधी दिल्या आहेत. त्या घटनेचा आम्ही निषेधही केला आहे. त्यांना घडलेल्या घटनेबदल शिक्षा दिली आहे. सूरज चव्हाण आमच्या सोबत काम करत आहेत. पण, त्यांच्यावर आता योग्य ती जबाबदारी दिली आहे. प्रत्येकाला टीकाटिपण्णी करण्याचा अधिकार आहे. पक्षाने योग्य तो निर्णय घेतला आहे. प्रत्येक संघटनेला मत मांडण्याचा अधिकार आहे. मी कधीही राजकीय दृष्ट्या टीकाटिपण्णी करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ध्वजारोहणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला
दरम्यान, राज्यात एकीकडे रायगड (Raigad)आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार, यावरून देखील नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अदिती तटकरे यांना रायगडमधून आणि गिरीश महाजन यांना नाशिकमधून ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी यावरून सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावर सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड आणि नाशिकचा निर्णय घेतील. ध्वजारोहणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. टीका जरी झाली तरी मी यावर बोलणार नाही. आघाडी-युतीचे सरकार असतात तेव्हा अशा गोष्टी होत असतात, असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.