औरंगजेबाच्या कबरीवरून सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या आस्थेचा विषय..’
सुप्रिया सुले:गेल्या अनेक दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले आहे .दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या अवमानावरूनही मोठा वादंग होताना दिसत आहे .दरम्यान औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत इतिहासकारांना इतिहासाचा अभ्यास करावा आणि राज्याला रस्ता दाखवावा .खरा इतिहास समोर आला पाहिजे .प्रत्येकाची आस्था वेगळी आहे .सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा अशी विनंती करत कबर पाडण्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी असमर्थन दर्शवलंय . दरम्यान, हटवण्यात योग्य नसल्याची भूमिका रोहित पवारांनी काल घेतली होती . (सुप्रिया सुले))
विधानसभेत औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणत अबू अझमींच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले मात्र त्यानंतर औरंगजेबाची कबर उखडून टाकावी ही मागणी मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहे. या मागणीला विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानेही पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कबर पाडू नये अशी भूमिका घेतली जात आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे हे राज्याचे छत्रपती आहेत .जय शिवराय मध्ये समतेची भाषा आहे .रयतेचा राज्य आहे .या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत हे विचार करून जयंत पाटील यांनी सांगितला आहे .आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत .औरंगजेब कबरीबाबत माझे मत असे आहे की ,इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करावा .आणि राज्याला रस्ता दाखवावा .खरा इतिहास आहे तो समोर आला पाहिजे .शिक्षण आरोग्य या सगळ्या विषयात आता सरकारने लक्ष घालावं .प्रत्येकाचे आस्था वेगळी आहे .माझी विनम्र विनंती आहे सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा .विरोधक आरोप करत आहेत की लोकशाही आहे .या राज्यात सर्वात जास्त खंडणीखोर कुठल्या पक्षात आहेत हे वेगळे सांगायला नको .असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या .
गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे . वाढती गुन्हेगारी,खंडणीखोरांची दहशत,दिवसाढवळ्या हत्या यासह बीड मधील शिक्षकाच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा बीड हादरले आहे. त्यावरूनही त्यांनी सरकारला आरसा दाखवला .विनाअनुदानित शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आपले जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे .यावरून महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावहन आहे असे म्हणत ट्विट केले आहे .
बीड शिक्षक आत्महत्येवरून सरकारला सुनावले
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावह नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, शिक्षकांना आदराने ‘गुरुजी’ म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बीडमधील नागरगोजे यांच्या आत्महत्येबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
अधिक पाहा..
Comments are closed.