माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल

सुप्रिया सुले: माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? असा सवाल सुळेंनी केला. तुमची आब्रु तुमच्याच माणसाने घालवली. व्हिडीओ कोणी काढला? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. रोहित पवार यांना सारख्या नोटीस येतात. पण आमचा रोहित घाबरत नाही असेही सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो

दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. कार्यक्रमात भाषण दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ यांच्यां समोरच  सुप्रिया सुळे यांची सरकारवर सडकून टीका केली. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व असल्याचे सुळे म्हणाल्या. 10 वेळेस वेळ मागून देखील मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो असेही सुळे म्हणाल्या. यावेळी सुळे यांनी अमित शाह यांचे जाहीर आभार देखील मानले. जुळवून दोन्ही बाजूने घ्यावं लागत, एका बाजूने नाही असे म्हणत सुळे यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना टोला लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट कर्जमाफी देतो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून फक्त राष्ट्रवादी शदर पवार गटाचे खासदार अमित शाह यांच्याकडे गेले होते. ते गृहमंत्री नाही तर सहकार मंत्री आहेत म्हणून असे सुळे म्हणाल्या. अधिकार त्यांना आहे म्हणून गेलो. मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्यामुळे मी मागणच बंद केलं आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो पण वेळ देत नाहीत याचा अर्थ काय, त्यांना वेळ द्यायचा नाही असे सुळे म्हणाल्या. मी ठरवलं आहे, इथे काम करत नाही ना, माझी कामं दिल्लीत होतात असेही त्या म्हणाल्या.

लाडकी बहिण योजनेत 4 हजार 800 कोटींचा मोठा घोटाळा

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची बाजू मांडायला आम्ही परदेशात गेलो होतो. आम्ही देशासाठी एक झालो. पवार साहेबांनी सांगितले देश पहिला, मग राज्य, मग पक्ष, मग कुटुंब असे सुळे म्हणाल्या. म्हणून आम्ही परदेशात जाऊन सरकारचा उदो उदो केला. मला लाडक्या बहिणींची चिंता आहे. 25 लाख लाडक्या बहिणींची नावं सरकारने कमी केली आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे,  झिरवाळ साहेब आपण ताकदीने याचा विरोध करायला हवा. योजना केली तेव्हाच म्हणाले होते राज्य आर्थिक संकटात जाईल. लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण चौकशी करणार असल्याचे सुळे म्हणाल्या. यामध्ये 4 हजार 800 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याचे सुळे म्हणाल्या. हजारो पुरुषांनी एवढे फॉर्म भरले कसे? असा सवालही त्यांनी केला.

झिरवाळ साहेब तुम्ही प्रधानमंत्री झालात तरी आम्हाला आनंद, मात्र, कॉपी करुन निवडून येण्यात काय अर्त

निवडून आलो की नाही हे आम्ही आता निवडणूक आयोगाकडून चेक करून घेणार आहोत. 188 लोक एका घरात राहू शकतात का? असा सवाल सुळे यांनी केला.  झिरवाळ साहेब तुम्ही मंत्री नाही प्रधानमंत्री झालात तरी आम्हाला आनंद आहे. मात्र कॉपी करून निवडून येण्यात काय अर्थ आहे. कॉपी करायची नाही अस सुळे म्हणाल्या. बारामती मतदारसंघात दीड लाख मतदार वाढले आहेत. शिरुरमध्ये एका घरात एवढे लोक निघतात. एकीकडे वोट चोरीचा आरोप दुसरीकडे अँब्युलन्स घोटाळा. 232 ची मेजॉरिटी आली असती तर आम्ही रामराज्य आणले असते असे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र दिवाळखिरीला निघाले आहे. आम्ही काही बोललो की नोटीस येतात.

मोठा समृद्धी झाली, पण माझ्या गावाचा रस्ता झाला नाही

आमच्या रोहितला सारख्या नोटीस येतात. पण  आमचा रोहित घाबरत नाही असे सुळे म्हणाल्या. भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आले होते तेव्हा म्हणाले होते सत्य परेशान हो सकता है पराजीत नही. मी 60 पैकी 30 वर्ष विरोधात होते. सत्तेत असताना आम्ही सगळे चांगले निर्णय घेतले. माझ्या राज्याचं नाव देशात 1 नंबर असावे अशी माझी इच्छा आहे. झिरवाळ साहेब कॅबिनेटमध्ये जाल तेव्हा आमचं दुःख सांगा या सरकारला. रस्त्यांमध्ये खड्ड्यांमुळे प्रॉब्लेम, आज तर कंबर धरत धरत पोहोचले नाशिकला असे सुळे म्हणाल्या. मोठा समृद्धी झाली, पण माझ्या गावाचा रस्ता झाला नाही हे महत्वाचं, असे सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:

Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर?

आणखी वाचा

Comments are closed.