वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही मग खूनाचं पान परस्पर कसं घडलं? सुरेश धसांचा सवा
सुरेश धस:संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) सादर केलेल्या दोषारोप पत्रातून सोमवारी समोर आलेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता अखेरची घटीका जवळ आली आहे असं म्हणत सुरेश धस आक्रमक झाले होते. सावरगडाच्या भक्तीगडावर वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचे पान हलत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या . मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान धनंजय मुंडे यांच्या परस्पर कसं घडला असेल ? असा सवाल सुरेश धसांनी केला. (Suresh Dhas On Dhananjay Munde)
आता अजित दादांनी निर्णय बदलू नये: सुरेश धस
वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची बैठक झाल्याचा मला कळलंय .सुरुवातीपासून मी हे सांगत होतो. हे इतकं बिभत्स, महाभयंकर आहे .राक्षस हैवान या सगळ्यांच्या पलीकडे ही घटना घडली आहे .घटिका जवळ आली हे कळतंय .राजीनामा आता ऐन वेळेस अजितदादांनी निर्णय बदलू नये .धनंजय मुंडेंना आता राजीनामा द्यायला लावा .काल ज्यांनी हे भयानक व्हिडिओ पाहिले असतील .हृदय असणारा प्रत्येक जण रडला असेल .मला शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री राजीनामा घेतील . असं म्हणतया आरोपींना तातडीने तीन-चार महिन्यात फाशी देण्याची मागणी सुरेश धस यांनी केली .
आमच्या मागे आमच्या मागे आणि एक बॉस
‘सातपुड्याच्या बंगल्यावर खंडणी विषयी भेट झाली होती का नाही याचे उत्तर धनंजय मुंडेंना द्यावच लागेल .मग ते पदावर असो किंवा नसो .इतकं सगळं होऊनही धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची भाषा बघा .राजीनामा घेतला तर मंत्रालयात घेराव घालू .वा रे पठ्ठे .तुमच्या जवळच्या माणसाने काय केलं ते पहा .पंकजा मुंडे म्हणाले आहेत सावरगडाच्या भक्तीगडावर वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचे पान हलत नाही . मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान धनंजय मुंडे यांच्या परस्पर कसं घडलं असेल? हा माझा सवाल आहे, असं सुरेश धस म्हणाले .हे सगळं धनंजय मुंडेंच्या आधारावर झालं आहे .हमारे पीछे एक आकार है आका के पीछे और एक आका है .ही गुर्मी या लोकांच्या मनामध्ये होती म्हणून हे सगळं झालंय . ‘असंही सुरेश धस म्हणाले.
पंकजा मुंडेंवर सुरेश धसांचा हल्लाबोल
‘पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली . त्यांना सगळ्या जगाचं पर्यावरण बघावं लागतं त्यामुळे बीड जिल्ह्याच्या प्रश्नाविषयी त्यांना विचारू नका .कारण बीड जिल्हा बद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही .इथून पुढे पंकजा मुंडेंना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प , पुतीन,गाझा पट्टी, डेन्मार्क,जर्मनी तत्सम देशांबद्दल हवामान वातावरण कसा आहे? याच्यावरच प्रश्न विचारायला हवेत .इतकी दुर्दैवी घटना घडली आहे .पंकजा मुंडे यांना विनंती आहे .या घटनेला तीन महिने होत आहेत .आता तरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटून या .कोण आहे धनंजय देशमुख ?कोण आहे संतोष देशमुख ?भारतीय जनता पार्टीचा तुमचा बूथ प्रमुख आहे .किमान आपला स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं वाटलं नव्हतं .काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारू नका, पुण्यातील प्रश्न विचारा असं त्या म्हणाल्या होत्या .मी म्हणतो त्यांना राज्याचे आणि देशाचे सुद्धा प्रश्न विचारू नका .पंकजा मुंडेंची कॅटेगरी आंतरराष्ट्रीय झाली आहे . तसेच प्रश्न त्यांना विचारा .’ असेही सुरेश धस म्हणाले .
अजितदादा तुमचा पक्ष जनतेच्या मनात क्लीन बोल्ड होत चालला: सुरेश धस
या घटनेचे फोटो व्हिडिओ पाहून मीही ढसाढसा रडलो .शेवटपर्यंत धाकधूक होती .अजितदादा निर्णय घेतात का नाही .अजित दादांना हात जोडून पाया पडून विनंती करतो .अजितदादा तुमचा पक्ष जनतेच्या मनात क्लीन बोल्ड होत चालला आहे .तुमच्या पक्षाला डाव्या बाजूला ही जागा राहिली नाही .तुमचा मिडल स्टंप ही उडाला आहे .ऑफ स्टंपही गेला आहे .आता किमान राजीनामा घ्या तर लोक म्हणतील बरं केलं .
https://www.youtube.com/watch?v=9o8dha5c8q8
हेही वाचा:
Dhananjay Munde Resignation | धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार, फडणवीसांना सुपूर्द करणार
अधिक पाहा..
Comments are closed.