मुंबईतील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांचा होणार सर्व्हे; कुर्ला घटनेनंतर पालिका प्रशासनाला आली जाग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुर्ला येथील प्रमोद महाजन उद्यानात तरुण जोडप्याला मारहाण आणि गैरवर्तन केल्यानंतर मुंबईतील उद्याने, मनोरंजन मैदाने, खेळाची मैदाने आणि मोकळ्या जागांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून  शहरातील उद्याने, मोकळ्या जागा व मैदानांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यात 710 उद्यानांचा समावेश आहे. या सर्व्हेनंतर आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही बसविण्यासह सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, संबंधित अधिकारी यांच्या बैठकीत उद्यानांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाने सर्व उद्याने आणि मैदानांची सद्यस्थिती तपासण्याची तयारी सुरू केली आहे. कोणती उद्याने संवेदनशील आहेत, पुठे सीसीटीव्ही पॅमेऱयांची आवश्यकता आहे आणि किती सुरक्षारक्षक तैनात करावे लागतील, याचा आढावा घेतला जाणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्यासाठी निविदा मागवून त्यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्याचाही विचार सुरू आहे. सध्या उद्यानांमध्ये असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्याची सूचना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही पॅमेरे स्थानिक पोलीस ठाणे आणि संबंधित विभाग कार्यालयाशी जोडण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Comments are closed.