प्रभादेवी पुलाच्या कामातील एक किलोचा नट महिलेवर कोसळला; सुदैवाने जीव वाचला, प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवडी-वरळी लिंक रोड आणि वरळी सी लिंकला जोडणाऱ्या डबलडेकर प्रभादेवी पुलाच्या कामात प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रभादेवी पुलावरून तब्बल एक किलोचा एक नट आज थेट एका महिला पत्रकारावर पडला. सुदैवाने हा नट महिलेच्या खांद्यावरील पर्सवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे महिला पत्रकाराने याबाबत तक्रार करण्यासाठी संबंधित बांधकाम प्रशासनाशी संपर्प केला असता पुणीही जबाबदारी घेण्यास तयार झाला नसल्याने या मार्गातून जाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभादेवी स्टेशनजवळ जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी नव्या दोन मजली पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा पूल शिवडी-वरळी एलिवेंट कनेक्ट प्रकल्पाशी जोडलेला आहे. या ठिकाणी 20 ते 30 फूट उंचावर प्रचंड वजनाचे गर्डर बसविण्याचे कामे अहोरात्र सुरू आहे. त्यामुळे हे काम करताना या ठिकाणचा रस्ता बंद ठेवणे अथवा त्या रस्त्यावर प्रवाशांना सूचना देण्यासाठी कर्मचारी असणे गरजेचे आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक असल्यास तशा सूचना देऊन बॅरिकेटिंग करणे गरजेचे आहे. मात्र सूचनांचा एखादा फलक वगळता या ठिकाणी पादचारी-रहिवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही.

Comments are closed.