ब्रिथअॅनालायझर मशिनीवर ‘पॉझिटीव्ह’, रक्त तपासणीत ‘निगेटिव्ह’; पश्चिम रेल्वेचे मोटरमन, गार्ड ठरताहेत ‘दारुडे’! चुकीच्या अहवालामुळे कर्मचारी धास्तावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चर्चगेट  स्थानकातील ट्रेन मॅनेजर-मोटरमन लॉबीमध्ये  ब्रिथअॅनालायझर सीएमएस मशीनमुळे पश्चिम रेल्वेचे मोटरमन आणि गार्ड यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जे कर्मचारी कधी दारूला स्पर्शही करीत नाहीत ते ब्रिथअॅनालायझर मशिनीवरील अल्कोहोल चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आढळत आहेत, मात्र त्याच कर्मचाऱयांचे रक्त तपासणीचे नमुने ‘निगेटिव्ह’ येत आहेत. मशिनीवरील चुकीच्या अहवालामुळे मोटरमन-गार्ड ‘दारुडे’ ठरत असल्याने खळबळ उडाली आहे. मशीन जवळपास दीड महिना बंद केली होती. तीच सदोष मशीन पुन्हा चाचणीसाठी वापरली जात असल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले.

प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोटरमन-गार्डची अल्कोहोल चाचणी केली जाते. खासगी पंपनीकडून संबंधित मशीनची योग्य देखभाल केली जात आहे. जर ब्रिथअॅनालायझर मशीनवर मोटरमन वा गार्ड ‘पॉझिटिव्ह’ आढळला तर त्यानंतर रक्ताचे नमुने तपासूनच पुढील कारवाई केली जाते. केवळ एका मशीनच्या आधारे कर्मचाऱयांवर कारवाई केली जात नाही.

अरुणकुमार मीना

मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Comments are closed.