सूर्यकुमार यादवच्या कमबॅकचा मार्ग बंद
आपल्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचा पुनरागमनाचा मार्ग बंद झाल्याचे दिसत आहे. बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले की, सूर्यकुमार यादव आता निवड समितीच्या योजनांमध्ये नाही. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, ‘सूर्यकुमार सध्या आमच्या निवड योजनेत नाही. आम्ही यशस्वी जैसवालसारख्या युवा खेळाडूलाही वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये स्थान मिळवून देऊ शकलेलो नाही. सूर्यकुमार लिस्ट-ए क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम घेत आहे आणि चांगली कामगिरी करत आहे, परंतु त्याला संघात समाविष्ट करणे कठीण आहे.’
Comments are closed.