प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत
प्राजक्ता माळी यांच्यावर सुषमा अंधारे : लाखो तरुणांच्या गळ्यातली ताईत असलेली अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, प्राजक्ता माळी (Prajakta Mali). प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali) उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. मराठी मनोरंजन विश्वातली लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. तसेच, ती आपल्या स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळेही चर्चेत असते. नुकतीच प्राजक्ता माळी एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली. या कार्यक्रमात प्राजक्तासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) रवीना टंडनसुद्धा (Raveena Tandon) उपस्थित होती. निमित्त होतं, ‘नारी शक्ती वंदन’ (Nari Shakti Vandan) महिला संमेलनाचं. यावेळी प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात बोलताना केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तसेच, प्राजक्ताच्या या वक्तव्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी परखड शब्दांत टीकाही केली आहे.
प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणालेली? (Prajakta Mali On CM Devendra Fadnavis)
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली की, “भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलंय, महाराष्ट्रातील प्रत्येकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे, महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे…” पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली की, “मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे, जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात…”
“त्याचबरोबर ते जेव्हा माईकवर बोलतात. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही. अहो चुकीचा शब्द सोडा त्यांचा सूर कधी ढळलेला मी पाहिला नाही…”, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांचं जाहीरपणे कौतुक केल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, “प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो… पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते जास्त हास्यास्पद वाटायला लागेल…”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.