आसाममध्ये मंगळवारी शपथविधी सोहळा पार पडला
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवार, 12 मे रोजी होणार आहे. हा शपथविधी सोहळा गुवाहाटीच्या खानापारा येथील मैदानावर होणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी सांगितले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अनेक उद्योगपतीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यामुळे भाजपप्रणीत एनडीए सरकार राज्यात सलग तिस्रयांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 12 मे रोजी गुवाहाटी येथे होणार असल्याची माहिती आसामचे मुख्य सचिव रवी कोटा यांनी दिली. राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी तीव्र झाली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. वृत्तानुसार, हिमंता बिस्वा सरमा यांची मुख्यमंत्री म्हणून पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. सध्या, पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून, राज्यपालांनी त्यांना प्रभारी मुख्यमंत्री म्हणून काम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
तिसऱ्यांदा सरकार स्थापन
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर राज्यातील भाजप संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. न•ा यांची निरीक्षक म्हणून आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सह-निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निवडणुकीत एनडीए आघाडीने राज्यातील 126 पैकी 102 जागा जिंकून इतिहास रचला. एनडीए राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परतली आहे. निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनीही चांगली कामगिरी केली. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी सकारात्मक ठरल्या. आसामसोबतच भाजपने पश्चिम बंगालमध्येही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले. पश्चिम बंगालमध्ये भाजप पहिल्यांदाच सत्तेत आले आहे.
Comments are closed.