जेतेपदासाठी इस्लाम जिमखाना-सीसीआय अंतिम लढत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने माजी कसोटीपटू विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई यांच्या गौरवार्थ आयोजित टी-20 स्पर्धेत इस्लाम जिमखाना आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना शनिवार, 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता खेळवला जाणार आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत इस्लाम जिमखान्याने पारशी जिमखान्याला 7 बाद 148 धावांवर  रोखले. विनायक भोईर आणि मुबश्शीर शेख यांच्या अचूक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी दबावाखाली राहिले. प्रत्युत्तरात 4 बाद 66 अशी बिकट स्थिती असताना प्रणय कापडियाने 82 धावांची दमदार खेळी करत संघाला 3 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीत सीसीआय आणि कर्नाटक स्पार्ंटग असोसिएशन यांच्यात शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळाला. सीसीआयने 20 षटकांत 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात तनुष कोटियनच्या 84 धावांमुळे कर्नाटक मजबूत स्थितीत होते, मात्र इरफान उमेर आणि कार्तिक मिश्रा यांच्या प्रभावी गोलंदाजीने सामना फिरवला. शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना कर्नाटक केवळ 10 धावाच काढू शकले आणि सीसीआयने 3 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

संक्षिप्त धावफलक – पारसी जिमखाना 148 नंतर 7 (सुमेर झवेरी, एन 30 वेदांत मुरकर 29, सागर छाब्रिया क्र. 33, विनायक भोईर 4/12, मुबशीर शेख 2/37) पराभूत विरुद्ध इस्लाम जिमखाना 7 बाद 149 ( प्रवीण शेट्टी 25 , प्रणय  कपाडिया 82 , शम्स मुलानी 3/ 38 ) , सीसीआयन7 बाद 189  (चिन्मय सुतार 45, ध्रुमील मटकर 39, प्रथमेश डाके 3 /38 , .विशाल दाभोळकर 2/ 26) विजयी विरूद्ध कर्नाटक स्पार्ंटग असोसिएशन 8 बाद 186  (अनिष चौधरी 57, तनुष कोटीयन 84, इर्फान उमेर 4/ 33 , कार्तिक मिश्रा 2 /44)

Comments are closed.