नाशिकच्या SITची मुंब्य्रात धडक; निदा खान पसार, पती ताब्यात, पथकाची रेकी अन् पकडण्यासाठीचा मोठा
नाशिक : नाशिकमधील नामांकित (Nashik Crime News) आयटी कंपनीतील लैंगिक छळवणूक आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) गुन्हा दाखल झाल्यानंतरही गेल्या २० ते २२ दिवसांपासून ती फरार होती. पोलिस तिच्या मागावर होती, तपास पथकं तिचा अनेक ठिकाणी शोध घेत होती. तर निदा खान ही गेल्या १२ दिवसांपासून ठाण्यातील मुंब्रा भागात सासर असलेल्या स्वतःच्या घरीच वास्तव्याला होती अशी माहिती मिळाली. तपास काढत एसआयटी पथक आपल्यापर्यंत पोहोचणार याची चाहूल लागताच ती चार दिवसांपूर्वीच त्या घरातून निघाली. एसआयटी पथकाने काल (शुक्रवारी दि. १७) सकाळी तिच्या घरी फिल्मीस्टाइल रेकी केली. तेव्हा तिचा पती मोईन खान (२७) कामावर गेल्याची माहिती मिळाली. तो काम करीत असलेल्या कंपनीतून त्याला ताब्यात घेतले. निदा मोईन नविद खान (२६) असे निदाचे पूर्ण नाव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.(Nashik Crime News)
दुसरेच काहीतरी नाव घेऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एसआयटी पथकातील तीन कर्मचारी मोईन खान याच्या घरी पोहोचले होते. तेव्हा सापळा रचून बसलेल्या पथकाने घरात प्रवेश केला. तेव्हा निदा खान व तिचा पती मोईन खान हे दोघेही सापडले नाही. एसआयटीच्या टीमने त्यांच्या घरापासून दूर आपले वाहन थांबवून करून पायी मोईन खानचे घर गाठले. गेल्या चार दिवसांपासून पथक मुंब्रा तसेच भिवंडी ठाण्यात तपास करत होते. साध्या वेशातील पथकाने गुरुवारी व शुक्रवारी सकाळी मोईन खानच्या घराची रेकी करून करून धाड टाकण्यासाठीची वेळ निश्चित केली. काल (शुक्रवारी) दुपारी नाशिक गुन्हे शाखेने मुंब्रा पोलिस ठाण्यात मोईन खानला आणले. मोईन याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन फरार निदा खानबाबत माहिती मिळाली.
Nida Khan: निदा खानची कामावरून हकालपट्टी
निदा खानने मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती मोईन खानसोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. आता तिला कामावरून काढल्याची नोटीस कंपनीने दिली. त्यानंतर तिची मावशी नुरी शेख तिला दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे घेऊन गेल्याचे चौकशीत पती मोईन याने सांगितले.
Who Is Nida Khan: कोण आहे निदा खान?
बोट – निदा एजाज खान
वय – 26 वर्ष
– कंपनीतील टीम लीडर ची प्रमुख आणि कंपनीत काम करणाऱ्या मुलींची टार्गेट टीम प्रमुख म्हणून काम करत होती.
– 2021पासून निदा खान ही कंपनीत काम करत होती.
– नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खान हिचे माहेर असून तिचे पती एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे.
– कंपनीत नवीन महिला किंवा तरुणी कामाला आल्यानंतर त्यांना या आरोपीकडून ट्रेनिंग देण्याची शिफारस निदा खान करत असे.
– आरोपींच्या प्रेमात आणि ठरवलेल्या धर्मांतर षड्यंत्रात मुली अडकवण्यासाठी तिची मुख्य भूमिका होती.
– या प्रकरणात आर्थिक मदत लागत असेल तर इतर आर्थिक मदत आरोपींना आवश्यक नुसार करत होती.
– निदा खान तिच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील मास्टरमाइंड नेमका कोण आहे याचा खुलासा होणार असल्याने तिची अटकेची कारवाई महत्त्वाची आहे.
– या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार म्हणून निदा खान ही असल्याने पोलिचे तीन पथक निदा खानच्या मागावर असून तपास सुरू आहे.
Nida Khan : निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील पण…
निदा खान ही एका सर्वसामान्य घरातील असल्याची माहिती आहे. तिचे लग्न 2021-22 मध्ये एजाज खान सोबत झाल्याची माहिती असून एका नामांकित महाविद्यालयात तिचे शिक्षण ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीमध्ये निदा ही सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करत असल्याचा देखील समोर आले आहे. मात्र या प्रकरणात निदा खानवर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झाल्याने या प्रकरणात तिची अटक ही नाशिक पोलिसांसाठी आणि या प्रकरणातील उलगडा होण्यासाठी सर्वाधिक निर्णय होणार आहे. निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा देखील संशय तपास यंत्रणे कडून व्यक्त केला जातोय.
Nashik News: राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक आज चौकशीसाठी नाशिकमध्ये
राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक आज चौकशीसाठी नाशिकमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. धर्मांतर प्रकरणात घटनास्थळी जाऊन पाहणी होणार आणि चौकशी केली जाणार आहे. महिला अत्याचार, धर्मांतरण मुद्द्यांचा आढावा घेणार आहेत. पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंद केल्या जाणार आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिसांकडून माहिती घेतली जाणार आहे. SIT तपासाची प्रगती आयोगाकडून तपासली जाणार आहे. चौकशीच अहवाल महिला आयोगाला सादर केला जाणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.