Mumbai News – मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मे पासून 10 टक्के कपात, महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबईत 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा 27 टक्क्यांवर आल्याने जलपुरवठ्याच्या नियोजनासाठी पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या भातसा, वैतरणा धरणांमधून राखीव 237 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी महापालिकेने पत्र दिले आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून सर्व धरणांमध्ये मिळून केवळ 27 टक्के पाणीसाठा उरला आहे. राज्यात उष्णतेने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मुंबईची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जेमतेम जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यातच एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे शिल्लक जलपुरवठ्याचे नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला.
Comments are closed.