मालीमध्ये दहशतवादी हल्ला, संरक्षण मंत्री कमारा यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख देश असलेल्या मालीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तेथील संरक्षणमंत्री सादियो कमारा यांचा मृत्यू झाला. जमात नुसरत अल् इस्लाम वल मुस्लिमीन (जेएनआयएम) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

अल् कायदाशी संबंधित जेएनआयएम आणि फुटिरतावादी संघटना तुआरेग यांनी मिळून मालीची राजधानी बामकोसह देशाच्या अनेक भागांत बॉम्बस्फोट घडवून आणले. काही ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे. काटी येथील लष्करी तळावर असलेल्या संरक्षण मंत्री कमारा यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला. त्यात कमारा यांचा मृत्यू झाला. देशाची राजधानी बामाको येथील सोन्याच्या खाणींनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.

Comments are closed.