शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा आज जनता दरबार, शिंदे गट भाजपात शीतयुद्ध? चर्चा रंगल्या
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून जनता दरबारावरून बराच खल होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज भाजप मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार असून ठाण्यासह पालघरमध्ये मोठी बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता महाजनवाडी सभागृहात मंत्री गणेश नाईक(Ganesh Naik) यांचा जनता दरबार पार पडणार असून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. (Janata Darbar)
मागील काही दिवसांपूर्वी भाजपच्याएका कार्यक्रमांमध्ये आपण दर दोन ते तीन महिन्यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं भाजप मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं होतं .हा जनता दरबार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याचं गणेश नाईक सांगत आहेत .असाच आणखी एक कार्यक्रमभाजपने हाती घेतला असून ‘आमदार आपल्या दारी ‘ आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप ठाण्यात शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे .निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची संघटना मजबूत करण्याचं काम सुरू आहे .भाजपनेते गणेश नाईक हे राज्याचे मंत्री असून राज्यभरात कुठेही त्यांना जनता दरबार घेता येऊ शकतो .मात्र दर दोन ते तीन महिन्यांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्यामागे वर्चस्व प्रस्थापित करण्याचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे .ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असून पालघरचे पालकमंत्री पद गणेश नाईकांकडे आहे .त्यामुळे ठाण्यातील जनता दरबाराचे उत्तर पालघर मध्ये जनता दरबार घेऊन घेतलं जाईल का याकडे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या नजरा आहेत .
जनता दरबाराची बॅनरबाजी .. मोठे शक्ती प्रदर्शन
आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजप मंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार असल्याने राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली होती .शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे .या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाण्यासह पालघरमध्येही मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे .जनता दरबाराचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा दरबार भरवणार असल्याचं शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं .ठाण्यानंतर पालघर मध्ये ही जनता दरबार घेणार असल्याचे ते म्हणाले .
https://www.youtube.com/watch?v=lo8ppp2ji44g
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.