ठाण्यात मेट्रो रुबाबात धावली; गायमुख ते कापूरबावडीदरम्यान चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हजारो ठाणेकर ज्या मेट्रोची वाट पाहत आहेत ती मेट्रो शुक्रवारी अखेर रुबाबात धावली. गायमुख ते कापूरबावडीदरम्यान तिची यशस्वी चाचणी करण्यात आली. मेट्रोचा डौल… हॉर्न… तसेच एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. एमएमआरडीएने ठाण्याच्या मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या बहुतेक परवानग्या मिळवल्या असून आता प्रतीक्षा आहे ती मेट्रो नियमितपणे धावण्याची.

डिसेंबरचे नियोजन

एमएमआरडीएने मेट्रोसाठी आवश्यक असलेली सीएमआरएस सुरक्षा चाचणी पूर्ण केली असून तसे प्रमाणपत्रदेखील मिळवले आहे. गायमुख ते कॅडबरी हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन एमएमआरडीएने आखले आहे. या मार्गावर कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनी पाडा व गायमुख अशी दहा स्थानके आहेत.

Comments are closed.