साताऱ्यानंतर ठाणे महापालिका, भाजप आमदाराने हिशोब काढला; विधानसभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा ‘सामना’
ठाणे महापालिकेवर संजय केळकर सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जोरदारा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी ऐकमेकांवर टीका टिपप्णी केली होती. आज सभागृहात देखील यावर चर्चा झाली. आता अशातच भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या कारभाराचा पाढा विधानसभेत वाचल्याचं पाहायला मिळालं. 293 अंतर्गत प्रस्तावावर बोलताना ठाणे महापालिकेत झालेल्या अपहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी केळकर यांनी केली.
नेमकं काय म्हणालं संजय केळकर?
293 अंतर्गत प्रस्तावावर बोलताना ठाणे महापालिकेत झालेल्या अपहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार संजय केळकर यांनी केली. बिल्डरांकडून येणे बाकी वसूल केलेली नाही, मोबाईल टॅावर कंपन्यांकडून 24 कोटी वसूल केले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेल्या दिलेल्या पैशाचा हिशोब दिला गेला पाहिजे. कोणत्या कामांसाठी किती पैसे दिले, एकाच कामासाठी दोनदा पैसे दिले का? कामे न करताच बिले काढली का? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीभाजप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली. ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, याची चौकशी झाली पाहिजे असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसापासून संजय केळकर यांचे ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसापासून संजय केळकर ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शिवसेनेवर टीका देखील करत आहेत. दरम्यान, महापािकेच्या निवडणुकीवेळी देखील संजय केळकर यांनी युती विना किंवा युतीसह भाजप दोन्हीसाठी तयार असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, ठाण्यात भाजप आणि शिवसेनेची महापालिका निवडणुकीसाठी युती झाली होती. ठाणे महापालिकेच्या अनेक मालमत्ता शहराच्या विविध भागात आहेत. काही वास्तू पालिकेला सुविधा भूखंडच्या बदल्यात बिल्डरांनी बांधून दिल्या आहेत. या मालमत्ता अनेक संस्थांना देण्यात आल्या असून या संस्था त्याचा व्यावसायिक वापर करून पैसे कमवित आहेत, असे आरोप सातत्याने होत आहे. याबाबत देखील भाजप आमदार संजय केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली होती. दरम्यान, संजय केळकर यांच्या वक्तव्यामुळं ठाणे महायुतीत ठिकणी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता शिवसेना काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
…तर ठाण्यात भाजप स्वबळावर जाण्यास मोकळे, भाजपकडून शिवसेनेला डेडलाईन, युती होणार की नाही?
आणखी वाचा
Comments are closed.