देवाच्या घरी उशीर होतो, अंधार नाही… न्याय मिळेल, गणेश नाईक यांनी राम पूर्णेकरांना दिलासा.

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भगवान के घर देर है अंधेर नहीं… काळजी करू नकोस… न्याय होईल…. नक्की होईल, आम्ही पूर्ण ताकदीनिशी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असा शब्द राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राम पूर्णेकर यांना दिला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना शिक्षा झालीच पाहिजे याचा पुनरुच्चारही नाईक यांनी केला.

ठाण्यातील मानपाडा परिसरातील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला जवळपास दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यांचे पुत्र राम पूर्णेकर हे न्यायासाठी पोलीस आणि, सरकार यांच्याकडे सातत्याने दाद मागत आहेत. वनमंत्री आणि पालघर’ जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा आज गडकरी रंगायतनमध्ये जनता दरबार होता. यावेळी राम पूर्णेकर यांनी गणेश नाईक यांची भेट घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे नाईक यांच्याकडे सुपूर्द करून सखोल तपासाची मागणी केली. याआधी गणेश नाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची ‘त्याच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली होती, राजकीय संघर्ष असावा, पण तो जीवघेणा नसावा असे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले होते.

माझ्याही जीवाला धोका

आमच्यावर कितीही दबाव आणला गेला किंवा दडपशाही झाली तरी आमची न्यायासाठीची लढाई अद्याप संपलेली नाही. ती यापुढेही ताकदीने पुढे लढवली जाईल, असे राम पूर्णेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माझ्याही जीवाला धोका आहे, असे राम पूर्णेकर यांनी यावेळी सांगितले.

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, सीबीआय यांच्याकडे वर्ग करण्यासाठी पूर्णकर कुटुंबाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Comments are closed.