श्रीकांत शिंदेंच्या विश्वासू मिनल पाटील यांची उमेदवारी कापली, आमदार कल्याणकरांवर आरोप
नंदाद महानगरपालिका निवडणूक : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी नांदेडमध्ये देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विश्वासू मीनल गजानन पाटील यांची उमेदवारी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. मीनल पाटील यांनाच उमेदवारी द्या असे श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले होते. मात्र, बालाजी कल्याणकर यांनी उमेदवारी कपात श्याम कोकाटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं मिनल पाटील यांनी अपक्ष राहण्याची तयारी दर्शवली आहे.
आमदार बालाजी कल्याणकर यांचा आम्हाला विरोध : गजानन पाटील
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू गजानन पाटील यांना एक वर्षांपूर्वी नांदेड येथे महानगरपालिकेसाठी पाठवण्यात आली होती. त्यानंतर मीनल पाटील यांनी प्रभाग क्रमांक तीन ची निवड केली आहे. या मतदारसंघात काम सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांनीं नगरपालिकांसाठी प्रचार सुरू केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शेवटच्या दिवशी मात्र त्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही. आम्ही इकडे काम करण्यास सुरुवात केल्यापासून स्थानिकचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा आम्हाला विरोध होता असे गजानन पाटील म्हणाले.
दहा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी एबी फॉर्म आमच्या नावाची पाठवली होती. स्थानिक शिवसैनिकांना श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक तीन मधून मिनल पाटील यांना उमेदवारी द्यायची असे सांगण्यात आली होती. येणाऱ्या काळाचा धोका लक्षात घेता स्थानिक के आमदार बालाजी कल्याणकर यांनी आमची उमेदवारी कापली यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे आमदार बालाजी कल्याणकर यांची लिखित तक्रार करणार असल्याचे गजानन पाटील यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी आजचा दिवस
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणेमुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.