'हे' 5 मोठे संघ फिफा वर्ल्ड कप 2026 ला मुकले, एक संघ तर चार वेळेचा चॅम्पियन
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरूवात येत्या १२ जूनपासून सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी ४८ संघ सहभागी होत आहेत, मात्र अनेक मोठे संघ या स्पर्धेसाठी अपात्र ठरले आहेत. चार वेळेचा विश्वविजेता इटली यावर्षीच्याही विश्वचषकाला मुकला आहे. तसेच इटलीबरोबर डेन्मार्क, पोलंड, नायजेरिया आणि युक्रेन हे संघही या स्पर्धेत खेळणार नाहीत. यावर्षीच्या विश्वचषकाचे यजमानपद पहिल्यांदाचा तीन देश भुषविणार आहे. अमेरिकेबरोबर या स्पर्धेचे सामने कॅनडा आणि मेक्सिकोमध्येही खेळले जाणार आहेत.
इटलीने १९३४ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्यांनी १९३८ मध्येही त्याची पुनरावृत्ती केली. तसेच त्यांनी त्यांचा तिसरा विश्वचषक १९८२ आणि चौथा विश्वचषक २००६ मध्ये जिंकला होता. ते २००६ नंतर विश्वचषकासाठी अपात्र ठरले आहेत. ते सध्या जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर आहेत. २०२६ च्या पात्रतेसाठी त्यांचा पेनल्टी शूटआऊटमध्ये बोस्निया आणि हर्झेगोविनाकडून पराभव झाल्यामुळे ते पात्र ठरू शकले नाहीत.
इटलीप्रमाणेच डेन्मार्कचाही पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला आणि ते फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर राहिले आहेत. सध्याच्या जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या या संघाला मागील फिफा विश्वचषकात एक अनपेक्षित दावेदार मानले जात होते. जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या नायजेरियालाही सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात पात्र होण्याची संधी मिळाली होती, मात्र त्यांनी ती गमावली. त्यांच्या जागी डीआर कॉंगो २०२६ साठी पात्र ठरला आहे.
युक्रेनला विश्वचषक खेळून २० वर्षे झाली आहेत. त्यांनी शेवटचा विश्वचषक २००६ मध्ये खेळला असून त्यांना फिफा मानांकन ३२ आहे. UEFA क्वालिफाय प्लेऑफमध्ये स्वीडनकडून पराभव झाल्याने त्यांना विश्वचषकाचे तिकीट मिळाले नाही. पोलंडही फिफाच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानी आहे. UEFA क्वालिफाय प्लेऑफच्या अंतिम सामन्याच स्वीडनने ३-२ ने पराभूत केले आणि त्यांचे २०२६ च्या विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगले. तसेच त्यांनी मागील (२०२२) विश्वचषक खेळला होता आणि ते बाद फेरीत (राउंड १६) पोहोचले होते.
Comments are closed.