बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी तिघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई)चे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा महाराष्ट्र सायबरने पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली. वरुण आखाडे, संकेत उन्हाळे आणि राहुल पाटील अशी त्यांची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे (एमएमसी)कडे एक तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. हे प्रकरण परदेशी वैद्यकीय पदवीधराशी संबंधित आहेत. ज्याने परदेशातून बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरीची पदवी मिळवली आहे.

Comments are closed.