मिरजमध्ये हवालदाराच्या चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या नोटा, कलर झेरॉक्स मशीनवर…., नेमकं
मिरज (जि. सांगली): मिरज शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency) जप्त केल्या असून, या प्रकरणात कोल्हापूर पोलिस दलातील एका हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency), कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर-प्रिंटर आणि एक वाहन असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. (Fake Currency)
पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की या बनावट नोटांची (Fake Currency) छपाई कोल्हापूर शहरातील पोलिस हवालदाराच्या चहाच्या दुकानात केली जात होती. हे दुकानच नोटा तयार करण्याचे अड्डे म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींकडून चौकशी सुरू असून, या बनावट नोटा कोठे कोठे फिरवल्या गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा यात सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची चर्चा होताना दिसत आहे. पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या. प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले आहे.
Fake Currency: आरोपींना पोलिस कोठडी
मुख्य सूत्रधार असलेले पोलिस हवालदार इब्रार आदम इनामदार (४४, रा. कसबा बावडा), सुप्रीत काडापा देसाई (रा. गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, टाकाळा), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड पूर्व, मुंबई) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने सर्वांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Fake Currency: कलर झेरॉक्स मशीनवर बनावट नोटांची छपाई सुरू असल्याचे उघड
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ठिकाणी सापळा रचत छापा टाकला आणि सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, या बनावट नोटांची छपाई कलर झेरॉक्स मशीनवर करण्यात येत होती. या प्रकारात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या साखळीचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
बनावट चलन: एक्वारे कन्स्ट्रक्शन इब्र्रे
इनामदार याच्या कसबा बावडा येथे असलेल्या सिद्धकला चहा या दुकानात कलर झेरॉक्स मशीनवर नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. इनार हा पोलिस दलात वाहनचालक म्हणून कार्यरत असून, कारवाईचा अहवाल कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आल्याचे घुगे यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.