कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! ग्राहक विभागानं कांदा खरेदीबाबत घेतला मोठा निर्णय
कांदा: कांदा (Onion) उत्पादकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दरवर्षी महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहक विभागातर्फे जवळपास 3 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. कांद्याची ही खरेदी बाजार समितींनी करण्याबाबत आपण सांगितल्याची माहिती मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी दिली आहे.
लोकांसमोर खरेदी झाली तर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता
कांद्याची लोकांसमोर खरेदी झाल्यास चांगला भाव मिळेल या उद्देशाने ही खरेदी पारदर्शकपणे देखील करण्यात येणार असल्याची माहिती जयकुमार रावल यांनी दिली आहे. यात चुकीचे काही झाल्यास कठोर करावाई करण्यात येईल अशी माहितीही जयकुमार रावल यांनी दिली. कांद्याची खरेदी ही बाजार समित्यांच्या मार्फत व्हावी असा आग्रह आम्ही केंद्र सरकारडे केल्याची माहिती रावल यांनी दिली आहे. लोकांसमोर खरेदी झाली तर दर वाढण्याची शक्यता आहे.
कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी दक्षता समिती नियुक्त
केंद्र शासनाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय हे ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’या केंद्रीय नोडल संस्थेमार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी होते. मात्र यात अनियमितता व भ्रष्टाचाराची अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी तसेच खरेदी केंद्रांवर शासनाचे प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली आहे. ही स्वागतार्ह बाब आहे; मात्र प्रत्यक्षात कारभार सुधारणार का, हा सवाल कायम आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कांदा खरेदीमध्ये अनियमितता
महाराष्ट्रात नाशिक, पुणेअहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरेदी दीड महिना उशिराने सुरू झाली. गेल्या दोन वर्षांपासून कांदा खरेदीमध्ये अनियमितता आहे. तसेच शेतकरी संघटनांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. या मुद्द्यावर शासन गंभीर नसल्याने सरकार टीकेचे धनी झाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो त्यावेळी दर कमी होताता. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. मागील वर्षी अचानक सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्याचा कांदा चिखलात माखला, नाशिकसह राज्यभरात कांद्याला कवडीमोल भाव, क्विंटलमागे शेतकऱ्याला किती मिळतायत?
आणखी वाचा
Comments are closed.