अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत मुंडन,जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या (Tirupati) दर्शनाला देशाच्या कोनाकोपऱ्यातून भाविक जात असतात. महाराष्ट्रातूनही दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक तरुपती दर्शनाला जातात. त्यामध्ये, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असतो. आता, नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आपल्या भक्ती आणि धार्मिक आस्थेबाबत अंबानी कुटुंबीयांचा (Anant Ambani) नेहमीच उल्लेख होतो. त्यामध्ये, अनंत अंबानी हेही तितकेच धार्मिक आणि श्रद्धाळू असल्याचं पाहायला मिळालं आहे. लालबागचा राजा गणेश मंदिर असो किंवा आता तिरुपती दर्शन. कारण, तिरुपती दर्शनानंतर त्यांनी येथील पिढ्यान पिढ्याची परंपरा जपत आपल्या केसांचे दान केले, आपले मुंडन करुन त्यांनी देवदर्शन केल्याचे फोटो आता समोर आले आहेत.
तिरुपती येथील श्री बालाजी मंदिरात श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दरबारात लाखों भाविक दरवर्षी आपले केशदान करतात. पिढ्यानं पिढ्या जपल्या जाणाऱ्या या परंपरेला धार्मिक मान्यता आहे. डोक्यावरील केस काढल्याने आपल्यातील अहंकारचा त्याग होतो, असा समज या केशदान परंपरेचा आहे. देवाप्रती आपली श्रद्धा आणि त्यागभावना दाखवण्याचं काम भाविकांकडून होतं. गर्भश्रीमंत उद्योगपती अनंत अंबानी यांनी देखील ह्याच परंपरेचं पालन करत मंदिर परिसरात मुंडन केले, आपले केशदान केले. आता, अनंत अंबानी यांचे मुंडन केल्याचे आणि तिरुपती मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवरुन नेटीझन्स आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
अंबानी कुटुंबीय श्रद्धाळू, आस्था जपणारे
देशातील टॉप उद्योगपती असलेल्या अंबानी कुटुंबीयांनी नेहमीच आपली श्रद्धा आणि धार्मिक भाव जपला आहे. देशभरातली प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, मंदिर आणि धार्मिकस्थळांना ते दर्शनासाठी सहकुटुंब जात असल्याचे दिसून आले. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांनी अनेकवेळा अयोध्येतील श्री राम मंदिर, तिरुपति बालाजी, द्वारकाधीश, बद्रीनाथ, केदारनाथ, शिर्डी साईबाब आणि इतरही अनेक मंदिरांत जाऊन पूजा, धार्मिक विधी केले आहेत.
का खास आहे तिरुपति बालाजी मंदिर?
आंध्र प्रदेशच्या तिरुमला डोंगरात वसलेलं तिरुपति बालाजी मंदिर देशातील सर्वात प्रसिद्ध आणि दरवर्षी सर्वाधिक भाविकांची संख्या असलेले मंदिरांपैकी एक मानले जाते. आजच्या कलयुगात या मंदिराला वैकुंठ म्हटलं जातं, तर भारताच्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. दररोज हजारों भाविक येथे भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी तासन-तास रांगेत उभे राहतात. येथील मंदिरात सर्वसामान्य माणसालाही, गरिबांनाही आपलं दातृत्व दाखवता येतं, कारण येथे केश दान ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. येथील ह्या परंपरेला स्वतंत्र धार्मिक महत्त्व देखील आहे.
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.