Video: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत पक्षप्रवेश
नाशिक : शहरात आता आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही, राज्यात नाशिकमधे रेकॉर्ड करायचे आहे युतीची बोळणी सुरू आहे. 80 टक्के जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. जुने-नवे सर्व एकत्र येऊन लढू आणि जिंकून येऊ असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक भाजपमध्ये आज माजी आमदार, माजी महापौरांसह 5 बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाला भाजप नेत्या तथा नाशिकमधील (Nashik) आमदार देवयानी फरांदे यांच्यासह निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचाही विरोध होता. मात्र, पक्षातील निष्ठावंतांचा विरोध झुगारुन महाजन यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.
मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशााठी भाजप कार्यालयात येत असताना, भाजप्या निष्ठावंतांनी त्यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातला होता. तर, देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला गैरहजेरी लावली. त्यामुळे, भाजप कार्यालयाबाहेर काही वेळ गोंधळाची परस्थिती निर्माण झाली होती. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक आमदार खासदार भाजपचे आहेत. आज दिनकर पाटील यांनी प्रवेश केला आहे, दिनकर पाटील यांनी आता कुठे जाऊ नये, असे या पक्षप्रवेशानंतर गिरीश महाजन यांनी म्हटले. मनसे, काँग्रेस, उबाठाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रवेश केला आहे, मी सर्वांचे स्वागत करतो. मुख्य प्रवाहात त्यांनी प्रवेश केला आहे, भाजपवर विश्वास आहे, नेतृत्वार विश्वास आहे, त्यामुळे या सर्वांनी प्रवेश केला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व आले आहेत, बाहेर आता कोणीही राहिले नाही. 100 च्या वर आमचे नगरसेवक निवडून येतील, आता चार वाढल्याने 104 होतील, असेही महाजन यांनी म्हटले.
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ यांचा भाजपात प्रवेश झाला. विशेष म्हणजे यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध होता. मात्र, तरीही वाघ यांचा पक्षप्रवेश झाल्याने भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. यासह, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे दिनकर पाटील यांनी सातत्याने भाजपवर सडकून टीका केली होती. आता, त्यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे. या सर्व पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या निष्ठावंत भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शिवसेना, मनसैनिकांची घोषणाबाजी
शिवसेना ठाकरे सेनेचे विनायक पांडे, यतीन वाघ आणि मनसेचे दिनकर पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा
देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही, नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांचा प्रवेश
आणखी वाचा
Comments are closed.