अशोक खरातचं भरभरुन कौतुक,युरोप पोलिसांचं उदाहरण; व्हिडिओ व्हायरल, पोपटरावांचं स्पष्टीकरण
नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी आणि भोंदू अशोक खरात (अशोक खरात) प्रकरणात आता तिसरा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी अशोक खरातचे महिलांसमवेत गैरकृत्य आणि अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तत्पूर्वी, राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्रिमहोदयांचसमवेत त्यांचे फोटोही समोर आले आहेत. याप्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून काही अधिकाऱ्यांचीही नावे समोर येत आहेत. त्यातच, आता हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार (Popatrao pawar) यांनी अशोक खरातचे कौतुक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. खरातच्या अघोरी विद्येचा ओशनोलॉजी असा उल्लेख करत त्यांनी खरातचे कौतुक केलंय. आता, व्हायरल व्हिडिओवर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
पोपटराव पवार यांच्याकडून एका कार्यक्रमात अशोक खरातचं गुणगान गातानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. ‘ओशनोलॉजीचा परदेशात चोर पकडण्यासाठी वापर’ केला जातो असा दावा पवार यांनी केल्याचं या व्हिडिओत दिसून येतं. खरातच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, व्यासपीठावर रुपाली चाकणकर यांचीही उपस्थिती पाहायला मिळते. अशोक खरात यांच्याकडे असलेल्या ओशनोलॉजीचा परदेशात चोर पकडण्यासाठी वापर केला जातो. पण, आपल्याकडे त्याला अंधश्रद्धा म्हणतात, असे वक्तव्य पोपटराव पवार यांनी केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सध्या लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत असून व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरणाला नवा राजकीय रंग मिळत असल्याचे दिसून येते.
पोपटराव पवारांचे स्पष्टीकरण
तो जो व्हिडिओ आहे तो 3 वर्षांपूर्वीचा आहे. त्या परिसरातील लोकांनी आग्रह करुन मला तिथं बोलावलं होतं. जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा अनेकजण तिथं बोलले. एखाद्या कार्यक्रमात व्यक्तीचं चारित्र्य आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे त्याप्रसंगी कुठलाही माणूस कितीही नालायक असला तरी आपण त्या व्यक्तीचं कौतुकच करतो. तिथं ओशनालॉजी हा विषय चर्चेत आलेला होता, मलाही हा विषय माहिती नव्हता. पण, तिथे इतर वक्त्यांच्या बोलण्यातून तो विषय आला, युरोपात पोलीस यंत्रणाचा याचा वापर करतात असेही तिथंच समजलं होतं. मला जरी काही कल्पना असती तर तिथं गेलोच नव्हतो, असे स्पष्टीकरण हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दिले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.