Ravindra dhangekar has been given big responsibility in Shiv Sena by Eknath Shinde in Pune


पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलेल्या रवींद्र धंगेकरांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण पक्षात प्रवेश केल्याच्या अनेक दिवसांनंतरही धंगेकरांना कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. पण आता अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांकडे मोठी जबाबदारी दिली आहे.

पुणे : काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवून आमदार झालेल्या, पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या रवींद्र धंगेकरांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलेल्या धंगेकरांनी पंजाची साथ सोडत शिवधनुष्य हाती घेतले. पण पक्षात प्रवेश केल्याच्या अनेक दिवसांनंतरही धंगेकरांना कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. पण आता अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांकडे मोठी जबाबदारी दिली आहे. रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केले आहे. (Ravindra dhangekar has been given big responsibility in Shiv Sena by मराठी in Pune)

सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाने सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांना पुणे शहरात पक्षवाढीची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी (कार्यक्षेत्र -पुणे महानगर) निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे. आता, धंगेकरांची निवड केल्यामुळे पुण्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढू शकते. कारण पुण्यात धंगेकरांना मानणारा मोठा वर्ग आहे, ज्याचा फायदा शिंदे गटाला आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होऊ शकतो.

हेही वाचा… Sanjay Raut on Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचा नकली चाणक्य, भुजबळांना मंत्री करताच राऊतांचा टोला

रवींद्र धंगेकर ह्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले, त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आक्रमक टीका केल्याने ते चर्चेत होते. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण असो किंवा पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन त्यांनी महायुती सरकारला सातत्याने लक्ष्य केले होते. मात्र, नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर, पुढील राजकीय मार्गावर वळण घेत त्यांनी काँग्रेसला बाय करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आपण कोणत्याही पदासाठी पक्षात प्रवेश केला नसून एकनाथ शिंदेंच्या विकासकामांचा अजेंडा पाहून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे धंगेकरांनी म्हटले होते.



Source link

Comments are closed.