एकनाथ शिंदेंची भेट, शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
सातारा : राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदांची (Vidhan parishad) निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरीत विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये, सातारा-सांगली (Satara) विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसून येत नाही. महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुठेतरी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या निवडणुकीवरुन महायुतीला टोला लगावला होता. आता, या चर्चेला अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj desai) यांनीच दुजारो दिल्याचं दिसून येत आहे.
सातारा-सांगली निवडणुकीबाबत शंभूराज देसाईंनी केलेल्या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दरे गावी आले असता दोघांमध्ये जवळपास एक तास बंद कमऱ्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत असताना शंभूराजे देसाई यांनी भाजपाच्या सध्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही बैठकांना शिवसेनेला विचारात घेतल्या जात नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले, सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी झालेली आहे, असे देसाई यांनी म्हटले.
विधान परिषद निवडणुकासंदर्भाने आम्हाला जर कोणत्याही बैठकांचं निमंत्रणच नाही तर आम्ही मग कोणत्या गाडीत बसायचं? असा सवाल यावेळी शंभुराज यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी खेडेगावात प्रचलित असलेल्या म्हणीचा संदर्भ देत ‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू’ अशी महायुतीमध्ये अवस्था असल्याचं त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. दरम्यान, येथील मतदारसंघात महाविकास आघाडीने अभयसिंह जगताप यांंना उमेदवारी जाहीर केली असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे भाजपचे उमेदवार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपदावेळीही धुसफूस
दरम्यान, सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राजांना (खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले) विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. तर, सातारा जिल्हा परिषद निवडणुकांवेळीही शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच द्वंद्व रंगल्याचं दिसून आलं होतं, त्याचे पडसाद थेट विधानसभेतही उमटल होते.
हेही वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.