ठाणे – बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी फुटणार अवजड वाहनांना १५ दिवस बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वाहनांच्या वर्दळीने ओव्हरपॅक असणाऱ्या ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी आता फुटणार आहे. आगामी गणेशोत्सव काळात ट्रॅफिक होऊ नये यासाठी आजपासूनच या मार्गावर अवजड वाहतुकीला नो एन्ट्री केली आहे. त्याचबरोबर या मार्गावर होणारी नियमित वाहतूककोंडी टाळण्यासाठी भविष्यातही अवजड वाहनांना कायमस्वरूपी पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे. गणेशोत्सवानंतर नागरिकांसह वाहनचालकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर १५ दिवस अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्राच्या हद्दीत ठाणे – बेलापूर मार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग समजला जातो. दररोज लाखो वाहने या मार्गावरून ये – जा करतात. त्यामुळे या मार्गावर रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. ऐरोली ते बेलापूर पट्टयात आयटी कंपन्या आणि कारखाने असल्यामुळे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठा ताण पडून तुफान वाहतूककोंडी होते.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सणानिमित्त वाहतूककोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सहाचाकी मध्यम, जड, अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ठाणे वाहतूक विभागाने आज याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून या वाहनांना सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत बंदी असणार, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

प्रवेश बंद : बेलापूर, नवी मुंबईमार्गे
कळव्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदरची वाहने पटणी- ऐरोली मार्गे डावीकडे वळून मुलुंडमार्गे ठाणे- नाशिक मार्गावरून घोडबंदर अथवा नाशिककडे जातील. प्रवेश बंद – पारसिक सर्कलमार्गे कळव्याच्या दिशेने नवी मुंबई, ठाणे शहरामध्ये येणाऱ्या वाहनांना पारसिक सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने पारसिक मुंब्रा-कल्याण फाटा शिळ- डायघर मार्गे अथवा खारेगाव टोलनाका मार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद माजिवडा साकेत महालक्ष्मी मंदिर राबोडीमार्गे कळवा नाक्याकडून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मध्यम, जड व अवजड (सहाचाकी व त्यावरील) वाहनांना महालक्ष्मी मंदिर (राबोडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळून गॅमन जंक्शन पारसिक मुंब्रा कल्याण फाटा शिळ-डायघरमार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद कळवा नाकामार्गे पारसिक सर्कलकडून नाशिक अथवा पुढे जाणाऱ्या मध्यम, जड व अवजड वाहनांना कळवा नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. वळून मुलुंडमार्गे ठाणे-नाशिक मार्गावरून घोडबंदर
पर्यायी मार्ग ही वाहने पटणी-ऐरोलीमार्गे डावीकडे अथवा नाशिककडे जातील.

Comments are closed.