घुसखोरांना हाकलण्यासाठी अमेरिकेने बनवली वेबसाईट
अमेरिकेत होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिकी सरकारने एक अनोखी वेबसाईट लाँच केली आहे. aliens.gov किंवा whitehouse.gov/aliens असे या वेबसाइटचे नाव आहे. ट्रम्प प्रशासनाने याला यूएफओ डिस्क्लोजरच्या ट्रेंडला पाहून लाँच केले. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प सरकार यूएफओ फाइल्स रिलीज करत होती.
व्हाइट हाऊसने या वेबसाईटबद्दल माहिती देताना सांगितले की, खरी समस्या आपल्यामध्ये राहत असलेले बेकायदेशीर लोक आहेत. जे 60 वर्षाच्या कव्हरअपमध्ये लपलेले आहेत. हे एलियन्स आपल्या शेजारी राहतात. दुकानावर खरेदी करतात. शाळेत आपल्या मुलांसोबत शिक्षण घेतात. परंतु, ते कायदेशीर या ठिकाणी राहत नाहीत. अमेरिकेत लाखो अवैध प्रवासी राहत असून ते अंधारात देशात घुसले आहेत. कव्हर-अप संपला. सीमा सुरक्षित करा. सर्वांना बाहेर काढा, असे स्पष्ट या वेबसाईटवर लिहिण्यात आले आहे. साईटवर सर्वात आकर्षक फीचर लाइव्ह इंटरॅक्टिव नकाशा दिला आहे. यात अमेरिकेतील वेगवेगळे शहरे आणि राज्यांकडून अटक करण्यात आलेली संख्या दाखवण्यात आली आहे.
Comments are closed.