नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्
तुकाराम मुंढे एफडीए नागपूर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याच तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ‘इफेक्ट’ (Tukaram Mundhe Effect) आता उपराजधानी नागपुरात (Nagpur News) पाहायला मिळाला आहे. किचनमध्ये अस्वच्छता आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नागपूरमध्ये तीन बड्या हॉटेलचे परवाने रद्द केले आहते. यात काटोल रोडवरील इंडियन तंदूर, द हट फॅमिली रेस्टॉरंट जगदीशनगर आणि फॅमिली गार्डन रेस्टोरेंट, फेटरी या तीन हॉटेल्सचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत या हॉटेलच्या किचनमध्ये मोठयाप्रमाणं उंदीर आढळून आले, सोबतच घाणीचे साम्राज्य देखील होते. त्यामुळे विभागाने तात्काळ कारवाईचा बडगा ugarat हॉटेलचे परवाने रद्द केले आहते. (नागपुरात एफडीएची कारवाई)
Nagpur News: वाढदिवसाच्या पार्टीत आरॊ कॅनचे पाणी पिल्याने 30 जणांना उलटया आणि मळमळचा त्रास
दुसरीकडेनागपूर शहरात एका वाढदिवसाच्या पार्टीत आरॊ कॅनचे पाणी पिल्याने 30 जणांना उलटया आणि मळमळचा त्रास झाल्याचे समोर आलं आहे. सुरवातीला पालिकेच्या पाण्यामुळे हे घडले असावे असा संशय होता, मात्र वापरलेल्या आरो कॅनच्या पाण्याची तपासणी केली असता या कॅनच्या पाण्यामुळेf हा प्रकार झाल्याचे तपासणीत पुढे आले आहे. नागपूरच्या हनुमान नगर परिसरातील एका सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे.
Dharashiv FDA : आठवडाभरानंतरही धाराशिव मधील दूध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपी मोकाट
धाराशिवच्या भूममध्ये अन्न व औषध प्रशासनाने 7 जुलै रोजी मोठी कारवाई करत दूध भेसळीची 61 गोण्या पावडर जप्त करत सात जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र यातील आरोपींनाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेल्या मठ्ठा पावडर आणि व्हे परमिएट जप्त करण्यात आले असून पावडर विक्री करणाऱ्यासह खरेदी करणारेही मोकाट असल्याचे चित्र आहे. सोलापूरच्या अकलूजमधून पावडर आणून भूममधील विविध दूध संकलन केंद्रात पुरवठा केला जात होता. भूममधील मधुबन ट्रेडिंग कंपनीचे बाळासाहेब गोडगे यांच्यासह सात जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फक्त दुधाचे प्रमाण आणि फॅट वाढवण्यासाठी पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीनंतर भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी अद्याप मोकाट असल्याने अटकेची कारवाई नेमकी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
Whey powder : व्हे पावडर म्हणजे काय ?
दुधापासून चीज, चीज किंवा दूध बनवताना जे पाणी उरतो त्याला व्हे म्हणतात. हे पाणी सुकवून त्याची पावडर तयार होते. तिला व्हे पावडर म्हणतात. यामध्ये प्रथिने जास्त असते.
Solapur : विहिरीतील मुरूम वाहतुक आणि वापराची परवानगी देण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच; मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा
विहिरीतील मुरूम वाहतुक आणि वापराची परवानगी देण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी सोलापुरातील एका मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय. विजयकुमार माने असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावात शेतातल्या विहीर खोदकामातून निघालेला मुरूमच्या वाहतुकीसाठी आणि वापरायची परवानगी मिळण्यासाठी तक्रारदाराने तहसीलदराकडे अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान स्थळ पाहणी करून सकारात्मक अहवाल देण्यासाठी विजयकुमार माने यांनी रॉयल्टी व्यतिरिक्त 1 लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार सोलापूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
Comments are closed.