पादचारी पुलाच्या बांधकामासाठी दिवा स्थानकात दोन दिवसीय विशेष ट्रॅफिक आणि पावर ब्लॉक
मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात दोन दिवसीय विशेष ट्रॅफिक आणि पावर ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. दिवा स्थानकातील कल्याण एंड एफओबी (पादचारी पूल) च्या बांधकामासाठी शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पहाटे 1.20 ते पहाटे 3.20 या वेळेत दोन तासांचा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून 00.08 वाजता सुटणारी कसाराकडे जाणारी ट्रेन आणि सीएसएमटी येथून 00.12 वाजता सुटणारी कर्जतकडे जाणारी ट्रेन ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येईल. या दोन्ही गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.
Comments are closed.