200 पेक्षा अधिक स्ट्राईक रेट! राहुल द्रविडच्या मुलाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घातला धुमाकूळ, सेहवागच्या मुलाचीही कामगिरी घ्या जाणून

क्रिकेट चाहत्यांसाठी द्रविड हे नाव काही नवे नाही. हे नाव ऐकताच राहुल द्रविडच्या शांत आणि संयमी फलंदाजाची आठवण येते, मात्र त्याचा मुलगा अन्वय याच्या उलट आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षाखालील संघाविरुद्ध आपल्या फलंदाजाची अनोखी शैली सादर केली. त्याने तब्बल 211.11 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दुसरीकडे वीरेंद्र सेहवागच्या मुलानेही पदार्पणात उत्तम कामगिरी केली.
राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर शुक्रवारी (18 सप्टेंबर) 19 वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 20 षटकांचा खेळला गेला. भारताने हा सामना अवघ्या 7 धावांनी जिंकला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताकडून आपल्या मुलाचे पदार्पण पाहण्यासाठी वीरेंद्र सेहवागनेही स्टेडियममध्ये हजेरी लावली. त्याचा मुलगा आर्यवीर सलामीला आला. त्याने 26 चेंडूंत 5 चौकारांच्या सहाय्याने 28 धावा केल्या. तसेच अन्वय सहाव्या स्थानावर फलंदाजीला आहे.
अन्वयने आल्याबरोबर लगेचच सुत्रे हाती घेतली. त्याने 18 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 38 धावा केल्या आणि संघाच्या धावसंख्येला आणखी गती दिली. बाद होण्यापूर्वी त्याने यशवर्धन चौहानसोबत पाचव्या विकेटसाठी 69 (34) धावांची भागीदारी केली. यशवर्धनने 34 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 54 धावा केल्या.
भारताने 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 182 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगला प्रयत्न केला. त्यांचे सलामीवीर नील पटेल (45) आणि हायडेन बार्बुलोविच (40) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. तसेच जॅक कॅझनेकने 27 चेंडूंमध्ये 55 धावा केल्या, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. हा सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना सोमवारी (21 सप्टेंबर), तर तिसरा सामना बुधवारी (23 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. (U19 IND vs AUS: Rahul Dravid’s Son Anvay Dravid Scored Runs at Strike Rate above 200 in 1st ODI)
Comments are closed.