दिग्गज शेन वॉर्नचा विक्रम ऍडम झम्पाकडून उद्ध्वस्त, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर विश्वविक्रम

सध्या ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. यामधील पहिले दोन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना शुक्रवारी (18 सप्टेंबर) खेळला गेला. यामध्ये ट्रेविस हेडच्या जबरदस्त शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने यजमानांना 357 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 84 धावांनी जिंकला, ज्यामध्ये ऍडम झम्पाने दोन विकेट्स घेत इतिहास रचला.

झम्पाने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन विकेट्स घेत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 200 विकेट्स पूर्ण केल्या. तो एकदिवसीयमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज ठरला. ही कामगिरी करताना त्याने फिरकीपटू वॉर्नला मागे टाकले आहे. वॉर्नचा विक्रम अनेक वर्ष अबाधित होता, जो आता झम्पाने मोडला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फिरकीपटूंमध्ये सर्वात जलद विकेट्स घेण्याची कामगिरी वॉर्नने 125 सामन्यांमध्ये केली होती. त्याला मागे टाकत झम्पाने 123 सामन्यांतच ही कामगिरी केली आहे. तसेच ही कामगिरी करणाऱ्या जगातील सर्व खेळाडूंची यादी पाहिली तर पाकिस्तानचा खेळाडू पहिल्या स्थानावर आहे.

दिग्गज पाकिस्तानी फिरकीपटू सक्लेन मुश्ताक यांच्या नावावर फिरकीपटूंमध्ये सर्वात जलद 200 एकदिवसीय विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने हा पराक्रम केवळ 104 सामन्यांमध्येच केला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा राशिद खान आहे. त्याने 115 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत झम्पा तिसऱ्या स्थानावर आला आहे. या यादीत भारताचा दिग्गज अनिल कुंबळे सातव्या स्थानावर आहे. त्याने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

फिरकीपटूंमध्ये सर्वात जलद 200 वनडे विकेट्स (सामन्यांनुसार)
104 – सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
115 – राशिद खान (अफगाणिस्तान)
123 – ॲडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)*
125 – शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
137 – आदिल रशीद (इंग्लंड)
141 – अब्दुर रज्जाक (बांगलादेश)

फिरकीपटूंमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 वनडे विकेट्स
5451 – सकलेन मुश्ताक
५७८२ – राशिद खान
६३८५ – ॲडम झाम्पा*
6881 – आदिल रशीद
६९८९ – शेन वॉर्न
७३३७ – अब्दुर रज्जाक

Comments are closed.