ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात? उदय सामंतांचं ऑपरेशन टायगरबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, टप
उदय समंत: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळत आहे. आता याबाबत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
उदय सामंत म्हणाले की, एखादं मिशन राबवायचं असताना ते सांगायचं नाही. पण एक मात्र निश्चित आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केले आहे, त्यामुळे काही मिशन राबवण्याची आवश्यकता नाही. काही लोकांना आता कळून चुकले आहे की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली चालते. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत, हे निश्चित आहे. टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल हे देखील निश्चित आहे, असे त्यांनी म्हटले.
अनेक लोक आमच्या संपर्कात
लवकरच खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. आमदार, खासदार आजही आमच्या संपर्कात आहे. लोकप्रतिनिधींना आता समजले आहे की, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उबाठा गटापेक्षा चांगले आहे. संवेदनशील आहे, त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
बालिश राजकारण कुणीही करू नये
विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की, मी आणि तुम्ही दोघेही भाजपमध्ये प्रवेश करूया. तुम्ही आज नागपूरमध्ये असताना विजय वडेट्टीवार यांची तुम्ही भेट घेणार आहत का? असे विचारले असता वडेट्टीवार माझे अतिशय चांगले मित्र आहेत. राजकारणापलीकडे ते माझे मित्र आहे. मात्र त्यांना सांगणारे लोक चुकीचे आहेत. आपल्या पक्षाची परिस्थिती काय आहे? ती आधी पाहावी. मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासात कुठेही त्रास होईल, असे कुठलेही कृत्य आमच्याकडून होणार नाही. हे बालिश राजकारणी आहेत. बालिश राजकारण कुणीही करू नये, असा टोला त्यांनी यावेळी विजय वडेट्टीवार यांना लगावला.
https://www.youtube.com/watch?v=Q_1QSUTOJU8
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.