महापौर होताना कोणत्या पक्षाचे लोक नॉट रिचेबल होतील हे कळेल, उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
उदय सामंत: आम्ही नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं त्यावरून उलट सुलट चर्चा सुरु आहे. आम्ही जे पूर्वी झालं तसं करणार नाही, आम्ही युतीत निवडणुका लढवल्या आहेत असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. काही लोकं आमची नाहक बदनामी करत आहेत. मात्र, कोण नॉट रिचेबल आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल असेही उदय सामंत म्हणाले. 2019 मध्ये जो उठाव झाला त्यातून काही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. महापौर होताना कोणत्या पक्षाचे काही लोक नॉट रिचेबल असतील हे येणाऱ्या काळात दिसेल असेही उदय सामंत म्हणाले.
या लोकांनी एकनाथ शिंदेंना काही सल्ला देऊ नये, सामंतांचा ठाकरेंना टोला
या लोकांनी एकनाथ शिंदेंना काही सल्ला देऊ नये, अशी टीका देखील उदय सामंत यांनी ठाकरे गटावर केली. महापौर होताना कोणत्या पक्षाचे काही लोक नॉट रिचेबल असतील हे येणाऱ्या काळात दिसेल असेही उदय सामंत म्हणाले. महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यभरात शिवसेना दोन नंबरवर आहे. राज्यात 402 ठिकाणी आम्हाला विजय मिळाला आहे. मात्र, जे आमच्यावर आगपाखड करतात त्यांना केवळ 100 हून अधिक जागा मिळाल्याची टीका उदय सामंत यांनी ठाकरे गटावर केली.
राऊतांनी फडणवीस यांच्याबाबत केलेलं ट्विट हा टोमणा होता की कौतुक हे तुम्हीच शोधा
निवडणुकीत जिथे कुठे चुकलयं याचं आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करु असेही उदय सामंत म्हणाले. ज्यांनी 2019 ला युतीत लढून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय केला त्यामुळे MiM ची ताकद मुंबईत वाढल्याचे सामंत म्हणाले. जिल्हा परिषदेत कोकणात युती जाहिर केली आहे.12 ठिकाणी युतीत लढू ही शक्यता नाकारता येणार नाही असेही सामंत म्हणाले. रायगडमध्ये 59 जागा आहेत. रायगडमध्ये राजकीय प्रवाह काय सुरू आहे. याबाबत आम्ही बैठका घेतल्या आहेत. याची माहिती खालील नेत्यांना दिलेली आहे. ही आमची उठावानंतर पहिली निवडणूक होती असेही सामंत म्हणाले. अनेक ठिकाणी चांगला निकाल आला जिथे कमी पडलो त्याचं आत्मपरीक्षण करु असेही सामंत म्हणाले. राऊतांनी फडणवीस यांच्याबाबत केलेलं ट्विट हा टोमणा होता की कौतुक हे तुम्हीच शोधा असेही सामंत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
आणखी वाचा
Comments are closed.