ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब; मुंबईच्या मतदार याद


मुंबई: सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं, अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) करणार आहेत. मुंबईच्या मतदार याद्यातील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) उघड करणार असल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली असून त्यात प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचे मार्गदर्शन आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सोमवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात करणार आहेत.

Shivsena UBT: मुंबईच्या मतदार यादीमधील घोटाळा उलगडून सांगणार

या निर्धार मेळाव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नेते विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत. वरळी डोम येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे. आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात मोठा बॉम्ब फोडणार आहेत. मुंबईच्या मतदार यादीमध्ये असलेला घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत.

Shivsena UBT: विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात बरेचसे बाहेरचे मतदार घुसवले

मतदार यादीतच दोष असतील तर निवडणुकीला अर्थ राहत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत याबद्दल पुराव्यासह सांगितले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने आवाज उठवला आहे. मतदार यादीमधील घोळाबाबत आयोगाकडे शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी तक्रारी व पाठपुरावा करूनही काहीच कारवाई झालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात बरेचसे बाहेरचे मतदार घुसवण्यात आल्याचे शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवूनही काहीच पावले उचलली गेली नाहीत.

Shivsena UBT: महापालिका निवडणुकीत त्याआधारे बोगस मतदान होऊ नये

बिहारच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीची छाननी केल्यानंतर 7 कोटी 90 लाख मतदारांची ती यादी स्वच्छ करून 7 कोटी 24 लाखापर्यंत आली आहे. म्हणजेच सुमारे 48 लाख बोगस मतदार त्यातून वगळले गेले. मुंबईतही शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली. त्यात प्रचंड घोळ दिसला असून तो कशा पद्धतीचा आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीत त्याआधारे बोगस मतदान होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल आदित्य ठाकरे या निर्धार मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत. या मेळाव्यात आणखी काय नवी माहिती आदित्य ठाकरे सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.